News

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लोकांबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. खरं तर, बिहार सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 81,000 अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.

Updated on 12 September, 2023 11:24 AM IST

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लोकांबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. खरं तर, बिहार सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 81,000 अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ते लोक आहेत जे केंद्र सरकारला आयकर भरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्य सरकार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची ओळख पटवते. त्यानंतर मदतीची रक्कम थेट लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी केली असता बिहारमधील ८१ हजार अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेल्याचे समोर आले आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट! औरंगाबादमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बिहार सरकारचे संचालक (कृषी) आलोक रंजन घोष म्हणाले की, तपासणीनंतर केंद्र सरकारने बिहारमधील एकूण ८१५९५ शेतकरी अपात्र लाभार्थी म्हणून ओळखले आहेत. बिहार राज्याच्या कृषी विभागाने सर्व संबंधित बँकांना अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे.

राज्यातील 81,595 शेतकऱ्यांकडून सुमारे 81.59 कोटी रुपये परत घ्यायचे आहेत. आवश्यक असल्यास, अपात्र शेतकर्‍यांना नवीन स्मरणपत्रे पाठविण्याचा सल्ला देखील बँकांना देण्यात आला आहे. याशिवाय अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यातून होणारे व्यवहारही बँकांना थांबवण्यास सांगण्यात आले आहे. इतर राज्यात देखील अशाच प्रकारे पैसे माघारी काढले जाणार आहेत.

माळेगाव सोमेश्वरला जमलं मग इतरांना का नाही.? इतर कारखान्यांना ४०० रूपये देण्यास भाग पाडा, स्वाभिमानीची अजित पवारांकडे मागणी

English Summary: Recovery begins! The government will take back the money from PM Kisan Yojana, you don't have your name right?
Published on: 12 September 2023, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)