News

अनेक बंडखोर आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा देताना अजित पवार निधी देत नसल्याचे सांगितले होते, यामुळे अजित पवारांनी आज याबाबत आकडेवारीच जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला निधी मिळाला नाही अस कारण सांगून 40 हुन अधिक बंडखोर आमदारानी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

Updated on 04 July, 2022 3:16 PM IST

सध्या राज्यात नवीन सरकार आले आहे, आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी त्यांनी बहुमत चाचणी जिंकली. यावेळी अजित पवारांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अनेक बंडखोर आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा देताना अजित पवार निधी देत नसल्याचे सांगितले होते, यामुळे अजित पवारांनी आज याबाबत आकडेवारीच जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला निधी मिळाला नाही अस कारण सांगून 40 हुन अधिक बंडखोर आमदारानी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.

यामुळे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज भर सभागृहात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर करून त्यांचा आरोप खोडून काढला. ते म्हणाले कधीही निधी देताना भेदभाव केला नाही. एकनाथ शिंदेंना ३६६ कोटींचा निधी दिला. संदीपान भुमरे याना १६७ कोटी, उदय सामंत याना २२१ कोटी, दादा भुसे ३०६ कोटी, गुलाबराव पाटील याना ३०९ कोटी रुपयांचा निधी दिला. शंभूराज देसाई २९४ कोटी, अब्दुल सत्ता याना २०६ कोटी रुपये दिले.

तसेच अनिल बाबर १८६ कोटी, महेश शिंदे यांना १७० कोटी, शहाजी पाटील याना १५१ कोटींचा निधी दिला असे सांगत अजित पवारांनी बंडखोर आमदारांचा निधी बाबतचा दावाच खोडून टाकला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. तसेच यावेळी अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी सभागृहात अनेकदा हशा पिकला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वपक्षीय एकमेकांना टोले मारताना बघायला मिळाले. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. आता विरोधी पक्षनेतेपदी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अजित पवारांचे नाव आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या;
डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..
ईडीची कारवाई मात्र जरंडेश्वर कारखान्याचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप
काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल सगळं ओके!! सकाळी स्पा, मसाज, जीम; आमदारांचा दिनक्रम ऐकून व्हाल चकीत

English Summary: rebels saying Ajit Dada not giving funds, Dada told statistics front everyone
Published on: 04 July 2022, 03:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)