मुंबई : केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता चलनातून 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मे पासून लोकांना बँकांमधून नोटा बदलून घेता येणार आहेत. परंतु, एका व्यक्तीला दररोज फक्त दहा नोटा बदलून मिळतील. नोटा तत्काळ बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8:30 वाजता भारतातील चलन रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही रक्कम बँक खात्यात ३० डिसेंबर २०१६ पर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा 2000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवीन नोटा चलनात आल्यानंतर सर्व बँकांना एटीएममधील ड्रॉवर बदलावे लागले. आधीच्या नोटा आणि नोटाबंदीनंतरच्या नोटांमध्ये खूप फरक होता. 2000 च्या नोटा बाजारात सामान्यपणे दिसल्या नाहीत.
कोट्यवधीच्या नोटा ना एटीएममध्ये होत्या, ना चलनात होत्या, अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्या नोटा नेमक्या कुठे गेल्या, या प्रश्नाचे उत्तर बँक अधिकाऱ्यांना मिळू शकले नाही. आता त्या नोटा चलनातून बंदीचा निर्णय घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात किती नोटा आहेत, हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे.
साधारणपणे १५ जूननंतर मान्सून सुरू होतो. अशावेळी 23 मे ते 30 सप्टेंबर दरम्यान दोन हजाराच्या नोटा बदलून घ्याव्या लागतील. नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदी प्रमाणे, बँकांनी नोटा बदलण्यासाठी नागरिकांची घाई होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र, त्या नोटा फारशा नसल्याने पूर्वीसारखी गर्दी होणार नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: 20 May 2023, 09:06 IST