कृषी क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध यासाठी एक प्रकारचे कृषी विज्ञान केंद्रेतसेच राज्यातील कृषी विद्यापीठे यांचा मोलाचा सहभाग आहे.
पिकांच्या उत्पादनवाढीसाठी चे तंत्रज्ञान असो की विविध पिकांचे नवनवीन वाण विकसित करणे असो यामध्ये कृषी विद्यापीठ मोलाची भूमिका निभावतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा विद्यापीठांच्या संशोधन आणि तंत्रज्ञानाबद्दल केलेल्या कामाचाबहुतांशी उपयोग होतो.
खास करून विविध पिकांचे वाण विकसित केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलेजाती लागवडीसाठी उपलब्ध होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. याचाच एक भाग म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील शिरगाव संशोधन केंद्राने भातचे विविध वाण विकसित केले आहेत. यामध्ये रत्नागिरी 8 या वानाला जास्त शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.
आतापर्यंत या वाणाची या केंद्रातून 32 टन बियाण्याची विक्री झाली आहे. या वाणाची मागणी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी भागांतून मोठ्या प्रमाणावरशेतकरी करीत असून अगदी परराज्यातून देखीलबियाण्याची मागणी संशोधन केंद्राकडे करण्यात येत आहे.
रत्नागिरी 8 या वाणाची वैशिष्ट्ये
रत्नागिरी आठ हे वान लागवडीपासून 135 दिवसांत काढणीस तयार होते. या वाणापासून मिळणारा तांदूळ चवीला उत्तम असून त्यामुळे शेतकऱ्यांकडून या या वाणाला चांगली मागणी आहे.
रत्नागिरी 7 या वाणाची वैशिष्ट्ये( लालभात वाण)
रत्नागिरी सात हे वाण लाल भाताच्या सुधारित वाण असून त्याला चांगली मागणी आहे.लाल भाताकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची लागवड कमी प्रमाणात परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर लाल भाताचे खूप महत्त्वअसल्याने त्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.गरोदर माता, लहान मुले व रुग्णांसाठी लाल भाताची पेज पोस्टीक असते.
लागवड केल्यानंतर 120 ते 125 दिवसात हे वान काढणीस तयार होते. असल्याचे कोड लवचिक असल्यामुळे जमिनीवर पडून लोळत नाही. शिवाय उत्पादकता जास्त असणारे हे वान असल्यामुळे याला मागणी चांगली आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतकरी पुत्र गोपाल उगले यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार प्रदान
Published on: 22 May 2022, 12:43 IST