नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हुंकार यात्रा काढण्यात आली आहे. शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा (Power Supply) करावा आणि शेतीमलाला हमीभाव (Guarantee Rate) देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पण आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे हे दोन प्रश्न निकाली लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे (whimsy of nature) शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी संकंटांमुळे हातातोंडाशी आलेला खास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांना आधार मिळत नाही. सर्वच पिकांना हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.
काही निवडक पिकांनाच हमीभावाचा आधार मिळत आहे. आता मात्र, याचे स्वरुप बदलून जर खर्चाच्या 50 टक्के अधिकचा हमीभाव मिळाला. तर शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे हमीभावाबाबत निर्णय घेतल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.
अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतीसाठी दैनंदिन वीजपुरवठा करण्याची मागणी केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या मागणीविरोधात राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात आंदोलनही केले होते.
राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...
मात्र सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रंदिवस फिरावे लागत होते. दरम्यान, वन्य प्राणी इतर प्राण्यांसाठी धोका आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा झाल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे. हुंकार यात्रा सोमवारी ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील सोनखेड येथे दाखल झाली होती.
IT RETURNS : आयटी रिटर्न डिव्हिजन मध्ये बदल
ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
Published on: 03 May 2022, 04:29 IST