एक जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यामध्ये एक जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात येत आहे. सदरच्या अभियानाची सुरुवात एक जुलै रोजी रायगड वरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात येणार आहे.
शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतक-यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी , दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी -बियाणे, अनुदान देणे. गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी, बंधारे, विहीरी, शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.
आजचे राज्यकर्ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. आज देशातील व राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. तोट्याची शेती झाल्याने शेतकरी आत्महत्या चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
शेतकरी विरोधी धोरणे राज्यकर्ते राबवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च न निघाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते एक जुलैपासून संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च, मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींची शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
यानंतर 30 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते 30 जून रोजी सायंकाळी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. एक जुलै रोजी पहाटे सहा वाजता रायगडावरती जाण्यास सुरुवात करून गडावरती पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या अभियानाची सुरुवात करणार आहोत.
८०-१०० रुपये लिटर दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करणार! 'या' सरकारचा मोठा निर्णय...
या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज रायगड येथे जाऊन संपूर्ण पाहणी केली. एक दिवस आधी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून दुसऱ्या दिवशी दुपारी सभा झाल्यानंतर सांगता होणार आहे.
ज्या कार्यकर्त्यांना गडावरती चालत जाणे शक्य नाही अशा कार्यकर्त्यांकरिता सदर ठिकाणी रोपवेची व्यवस्था आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.
सरकारी वाळू आली! पुणे जिल्ह्यात ११ ठिकाणी सरकारी वाळू उपलब्ध..
नेपियर गवत कोळसा आणि सीएनजी गॅस तयार करणार, जाणून घ्या दुहेरी फायदा..
अंजीराची शेती कशी करावी, किती उत्पन्न मिळेल, जाणून घ्या...
Published on: 22 June 2023, 11:55 IST