गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यभर दौरे करत आहेत. ऊस उत्पादक अडचणीत आला असून त्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आता वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी ते मोर्चे काढत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कारखाने बंद ठेवण्याचे जाहीर केले होते.
यामुळे आता याला प्रतिसाद देत इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याने हंगाम बंद ठेवला आहे. आज सकाळी कारखान्याचे गाळप बंद करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दोन राज्यपालपदे आणि दोन केंद्रीय मंत्रीपदे! शिंदे गटाच्या 'या' नेत्यांची लागणार वर्णी
असे असले तरी शेजारील सोमेश्वर व माळेगाव कारखान्याचे गाळप मात्र सुरूच आहे. यामुळे शेतकरी संघटना काय भूमिका घेणार हे देखील महत्वाचे आहे. तसेच अनेक कारखान्यात उसाचे वजन करताना काटामारी केली जाते, असा आरोप केला जात आहे.
यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. राज्यातील साखर कारखान्याकडून होत असलेल्या काटामारीबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता.
येत्या आठ दिवसांत मिळणार पीक विम्याची भरपाई रक्कम, अब्दुल सत्तार यांची माहिती
यावेळी या मोर्चाची दखल घेवून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खाजगी वजन काटे वैद्यामापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित केले असल्याने खाजगी वजन काट्यावरून वजन करून आणलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. तसेच विनापावती साखरेची विक्री करून सरकारच्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या जीएसटीलाही चुना लावतात. याबाबत शासनाने साखर कारखान्यांच्या गोदामावर अचानक छापे टाकावेत आणि बेहिशेबी साखर किती आहे तपासावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच एफआरपीच्या मुद्द्यावर आता आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो गाय, म्हैस आणि शेळी खरेदी विक्रीसाठी अॅप, सर्व कामे होतील एका क्लिकवर
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार तरी कधी? 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांची आत्महत्या..
शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्या! आता युवासैनिक उतरले मैदानात..
Published on: 17 November 2022, 09:56 IST