राजस्थान सरकारने सुमारे 13 लाख शेतकऱ्यांनी कृषी वीज जोडणीसाठी 291 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत असून त्यांना पूर्ण मदत करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, 2024 पर्यंत राज्यातील चार लाख 88 हजार शेतकऱ्यांना नवीन कृषी वीज जोडणी दिली जाईल व त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याचा प्रयत्न राजस्थान सरकार करणार आहे.
पुढे ते म्हणाले की,राज्य सरकारचा योजनांमधून सुमारे1.25 कोटी शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना एक हजार 44 कोटी रुपयांचे वीजबिल अनुदान देऊन दिलासा मिळाला आहे. या अनुदानामुळे जवळजवळ 43 लाख ग्राहकांची वीज बिले शून्य झाले आहेत, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
राजस्थान सरकारच्या सक्रिय आणि उत्तम व्यवस्थापनामुळे राजस्थानातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये खडक उन्हामुळे विजेचा वापर वाढला असला तरी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. आता जून आणि जुलै च्या मागणीनुसार पुरवठा यासाठी राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे.
सात लाख शेतकऱ्यांचे वीजबिल झाले शून्य
यावेळी मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की,शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री किसान मित्र योजनेच्या माध्यमातून 12 लाख 66 हजार हून अधिक शेतकऱ्यांना कृषी वीज जोडणीसाठी 291.54कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
पुढे ते म्हणाले की राज्यातील 1.15 कोटीहून अधिक घरगुती ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यासाठी मुख्यमंत्री घरगुती वीज अनुदान योजनेच्या माध्यमातून 752.58 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यामुळे सुमारे 36 लाख घरगुती ग्राहक आणि सात लाख शेतकऱ्यांचे वीजबिल शून्य झाले आहे.
नक्की वाचा:खुशखबर ! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 8 हजार 640 रुपये; जाणून घ्या याविषयी...
Published on: 05 June 2022, 03:01 IST