सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आता भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मात्र उत्तर राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे.
तसेच पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही थंडीची लाट येऊ शकते. आंध्रप्रदेश, तामिळनाडूचा किनारी भाग आणि अंदमान निकोबार बेटांवर पावसाची शक्यता असल्याने संबंधित भागातील जनतेला सतर्क राहण्याची गरज आहे.
असे असताना महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याने रब्बी हंगामासाठी लगबग करत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधान पाहायला मिळणार आहे. मात्र इतर राज्यात शक्यता असल्याने राज्यातील शेतकरी देखील चिंताग्रस्त आहे.
शेतकऱ्यांनो जास्त उत्पन्न काढा, पण पत्रकारांना उत्पन्न सांगू नका, शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
दरम्यान, राज्यात सध्या थंडीचा जोर वाढत आहे. यामध्ये अजूनच वाढ होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही.
लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पाच ते सात तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पाऊस पडणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
वाहने 150 च्या स्पीडने जात आहेत, टोलमधून करोडोची कमाई, पण समृद्धी महामार्गावर काम केलेल्या तीनशे मजुरांना 5 महिन्यापासून वेतन नाही
आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, सौर ऊर्जा प्रकल्पाना दिली चालना...
तीतर पालनातून करा लाखोंची कमाई, शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर..
Published on: 04 January 2023, 11:24 IST