News

सध्या सर्वजण पावसाची वाट बघत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सध्या मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला.

Updated on 16 June, 2023 12:18 PM IST

सध्या सर्वजण पावसाची वाट बघत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सध्या मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला.

आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वारे ११ जूनला तळकोकणात दाखल झाले. मात्र, त्यांची वाटचाल थांबली आहे. हवामान विभागाने येत्या चार आठवडय़ांचा पावसाचा विस्तारित अंदाज जाहीर केला आहे.

त्यानुसार २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल. राजस्थानवगळता देशाच्या अन्य भागांत मोसमी पाऊस २३ जूननंतर सक्रिय होईल, असेही ते म्हणाले.

शेतीसाठी सरकार करणार मदत, 15 लाखांची करणार मदत, असा करा अर्ज..

मोसमी वारे १६ ते २२ जून या काळात ईशान्य भारत, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागांत दाखल होतील. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मोसमी वारे गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांश भागात पोहोचतील.

२३ ते २९ जून या काळात मोसमी वारे राजस्थानवगळता पूर्ण देशात दाखल होऊन देशाच्या बहुतांश भागांत पाऊस सुरू होईल. ३० जून ते ६ जुलै या आठवडय़ात देशात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. ७ ते १३ जुलै या काळातही देशात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

माॅन्सूनची वाट रखडली, शेतकरी चिंतेत...

विदर्भातील कमाल तापमान गुरूवारी चाळीशीपार गेले. तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशाहून अधिक वाढ झाल्याने अमरावती येथे तीव्र उष्णतेची लाट आली होती, तर यवतमाळ, वाशीम, अकोला, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली येथे उष्णतेची लाट आली होती.

दरम्यान, पुढील पाच दिवस विदर्भातील कमाल तापमानात कोणतेही बदल होणार नाहीत, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

जांभळाने शेतकऱ्यांना केलंय मालामाल! एक जांभूळ दहा रुपयाला, किलोचा दर चारशे रुपयांवर..
जांभळाने शेतकऱ्यांना केलंय मालामाल! एक जांभूळ दहा रुपयाला, किलोचा दर चारशे रुपयांवर..
येत्या आठवड्याभरात ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...

English Summary: Rain forecast misses, Monsoon winds stalled in state, likely to become active from June 23
Published on: 16 June 2023, 12:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)