News

पंजाबच्या बासमती तांदूळाला त्याचा विशेष सुगंध आणि लांब दान्यासाठी उत्तर अमेरिका, युरोप, आणि मध्यपूर्व सर्व परदेशात जास्त मागणी आहे.

Updated on 02 June, 2022 1:23 PM IST

पंजाबच्या बासमती तांदूळाला त्याचा विशेष सुगंध आणि लांब दान्यासाठी उत्तर अमेरिका, युरोप, आणि मध्यपूर्व सर्व परदेशात जास्त मागणी आहे.

भारताच्या चाळीस हजार कोटींच्या बासमती निर्यातीमध्ये पंजाबचा वाटा जवळपास 40 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाकारले जाऊ नये म्हणून शेतकरी सामान्यतः प्रीमियम सुगंधी बासमती भातावर फवारणी करण्यात येणाऱ्या कीटकनाशके आणि तत्सम तणनाशके इत्यादी 10 रसायनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे.

तथापि ट्रायसायक्लोझोल आणि कार्बेन्डाझिमचा समावेश असलेल्या एग्रो केमिकल च्या ट्रेस मुळेमागील वर्षात तांदळाच्या काही खेपा नाकरण्यात आल्याने राज्य विभाग, शेतकरी आणि निर्यातदार त्यांच्या अती वापरापासून सध्या सावध आहेत. या दोन रसायनाने व्यतिरिक्त बंदी यादीत ठेवलेली इतर कृषी रसायने असिफेट, बुप्रोफेझीन, क्लोरोपायरीफॉस, मेथामिडोफॉस, प्रोपिकॉनाझोल, थायमेथॉक्झाम,  प्रोफेनोफोस आणि आयसोप्रोथिओलेन यांचा समावेश आहे.

याबाबतीत कृषी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एक केस केली आहे आणि ती बंदीसाठी सरकारकडे पाठवली आहे. केंद्राच्या कीटकनाशक कायदा 1968 नुसार राज्य सरकार  काही दिवसांसाठी बंदी घालू शकते जी नंतर आपोआप मागे घेतली जाते आणि कायमस्वरूपी बंदी हा केंद्राच्या खत मंत्रालयाचा विशेषाधिकार आहे.

नक्की वाचा:ट्रॅक्टर कट्टा: YM3 ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान,जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये

बासमतीची पेरणी जूनच्या उत्तरार्धात आणि जुलैच्या सुरुवातीला होण्याची अपेक्षा आहे आणि वांछित तन, कीटक आणि पिकावर हल्ला करणाऱ्या कीटकांची लढण्यासाठी राज्य विभाग आणि पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना यांनी पर्यायी संयुगे वापरण्याबाबत सल्लागार जारी करणे अपेक्षित आहे.

बासमती एक्सपोर्ट्स असोसिएशनच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार,या ऍग्रो केमिकल्स वरील बंदी मुळे शेतकऱ्यांना किमान 300 कोटींची बचत होऊ शकते.ते पुढे म्हणाले की आम्ही सुधारात्मक पावले उचलल्यासआयात दारांवर त्याचा चांगला परिणाम होतो कारण ते आमच्या उत्पादकांना अधिक स्वीकाराहर्या बनतात आणि चांगल्या किमती देतात.

नक्की वाचा:आता नाही शेततळ्याची गरज, या तंत्राने करा मत्स्यपालन अन कमवा पाचपट अधिक उत्पन्न

बासमतीचा किमतीत वाढ अपेक्षित

 सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळेयेत्या हंगामात बासमती चे भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकले गेले होते आणि त्याआधी 2020 मध्ये किमतीतील घसरणीमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये दिलेल्या भरडसर जातीच्या धानावर देऊ केलेल्या किमान आधारभूत किमतीत विकले गेले होते.

नक्की वाचा:Farm Machinary: शेतकरी दादांनो! जमीन उंच-सखल आणि डोंगराळ भागात आहे, तर ही यंत्र पडतील उपयोगी, वाचतील कष्ट

English Summary: punjaab state goverment ban to 10 chemical insecticide for sprey baasmati rice crop
Published on: 02 June 2022, 01:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)