News

नवी दिल्ली येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. उपमहासंचालक (पिकशास्त्र) डॉ. टि.आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास मान्यता देण्यात आली आहे.

Updated on 16 July, 2022 5:48 PM IST

नवी दिल्ली येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. उपमहासंचालक डॉ. टि.आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन पिकांच्या वाणास मान्यता देण्यात आली आहे. भविष्यात महाराष्ट्राबाहेरही या वाणांची लागवड होणार आहे.

करडई पिकांच्या पीबीएनएस १८४, देशी कापसाच्या पीए ८३७ आणि खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास मान्यता प्राप्त झाली. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडुन वाण मान्यतेबाबतचे पत्र विद्यापीठास मिळाले आहे अशी माहिती दिली. विशेष म्हणजे करडई पिकांच्या पीबीएनएस १८४ वाणास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडु या राज्यांकरिता लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे.

कापसाच्या पीए ८३७ या वाणाची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती वाणास महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारण करण्यास मान्यता मिळाली आहे.

हे वाण केंद्रीय वाण प्रसारण उपसमितीनी प्रसारित केले आहे. त्यामुळे या वाणांचे बीजोत्पादन हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते. विशेष म्हणजे वाणांचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून वाणांचा प्रचार व प्रसार बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावरही होणार आहे.

तीन वाणांबद्दल थोडक्यात

करडई पीक पीबीएनस १८४
या वाणाचे उत्पादन हेक्टरी १,५३१ किलो एवढे आहे. यात तेलाचे प्रमाण ३१.३ टक्के इतके आहे. या वाणास परिपक्व होण्यासाठी १२० ते १२३ दिवसांचा कालावधी लागतो.

मोठी बातमी: ठरलं तर! औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे पुन्हा नामांतर

खरीप ज्वारीमध्ये परभणी शक्ती वाण
हा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला असून यापूर्वीच देशातील पहिला जैवसंपृक्त वाण म्हणून परभणी शक्ती या वाणास महाराष्ट्र राज्य वाण प्रसारण समितीने मान्यता दिली आहे. परभणी शक्ती वाणातील धान्यात प्रती किलो ४२ मि. ग्रॅम लोहाचे प्रमाण आहे.

देशी कापूस वाण पीओ ८३७
या वाणाच्या कापसाचे उत्पादन हेक्टरी १५ ते १६ क्विंटल आहे. धाग्याची लांबी २८ मिली मिटर इतकी आहे. या वाणास पक्व होण्यासाठी १५० ते १६० दिवसांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे हा वाण रसशोषक किडी आणि दहीया रोगास सहनशील आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याचे कष्ट मातीमोल; माथेफिरूने शेतात...
बापरे! चक्क गटारीच्या पाण्याने धुतली भाजी; किळसवाणा प्रकार उघडीस

English Summary: Proud! Recognition of three varieties of Maharashtra's crops at the national level, farmers will benefit
Published on: 16 July 2022, 05:48 IST