News

खते खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या (Agricultural Department) कृषी विभागावर कृषी क्षेत्राचा डोलारा उभा आहे त्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हा प्रकार सुरु असून महाराष्ट्रातील सहा खत कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.

Updated on 14 June, 2022 6:24 PM IST

सध्या पावसाळा सुरु झाला असून शेतकऱ्यांची कामांची लगबल सुरु आहे. तसेच बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकरी लगबग सुरु आहे. असे असताना मात्र खते खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या (Agricultural Department) कृषी विभागावर कृषी क्षेत्राचा डोलारा उभा आहे त्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हा प्रकार सुरु असून महाराष्ट्रातील सहा खत कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.

यामुळे अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. आता राज्यातील 6 खत कंपन्यांकडून अवैध कागदपत्रांची जुळवाजुळव करुन खताची विक्री, अनाधिकृत खताचा साठा अशा एक ना अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातील 6 कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत.

या सात कंपन्यांमध्ये सांगली येथील लोकमंगल कंपनी, तसेच वसंत अग्रो टेक, नागपूरातील विदर्भ मार्केटींग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर अशी या कंपन्यांची नावे आहेत. यामुळे आता इतर कंपन्या अशाप्रकारे फसवणूक करताना हजार वेळा विचार करतील. शेतकऱ्यांवर सध्या अनेक संकटे येत आहेत. यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय

सध्या घटते उत्पादन आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आता असे प्रकार समोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कसे व्हावे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादन वाढीसाठी प्रमाणित बियाणे महत्वाचे आहे. मात्र असे प्रकार समोर येत असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या;
मोफत रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांची काळजी मिटली! आता प्रत्येक शुक्रवारी हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..

English Summary: Production bogus manure 6 companies state, order Center file criminal cases
Published on: 14 June 2022, 06:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)