News

सध्या राज्यात अणेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या पुरग्रस्तांचा दौरा केला. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन (Crop Damage) पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

Updated on 29 July, 2022 3:55 PM IST

सध्या राज्यात अणेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या पुरग्रस्तांचा दौरा केला. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन (Crop Damage) पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याशिवाय नुकसानीची दाहकता ही लक्षात येत नाही, पावसामुळे केवळ शेतीचेच नुकसान झाले असे नाही तर घरांचीही पडझड झाली आहे. नुकसानीची तीव्रता पाहता नियम-अटी बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

यामुळे आता सरकार काय मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच ते म्हणाले, हा दौरा केवळ शेतकऱ्यांसाठी आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही. असे असतानाही कोणी प्रश्न उपस्थित केले तर त्यांना मात्र, जशाच तसे उत्तरही दिले जाईल असेही त्यांनी प्रवीण दरेकर यांना सुनावले आहे. प्रवीण दरेकरांनी या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सर्वात सुरक्षित मर्सिडीज बेंझ कार मिळणार, मिसाईल हल्लाही फसणार, वाचा खासियत..

बांधावरची स्थिती ही वेगळी असून त्वरीत मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नुकसानीचे स्वरुप एवढे मोठे आहे की, सरकारने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांचा मोडून पडलेला संसार पु्न्हा उभा राहणार आहे, असेही ते म्हणाले.

श्रीलंकेनंतर आता इराक, आंदोलकांचा संसदेवर ताबा, देशातील परिस्थिती हाताबाहेर..

शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत कमी कालावधी उत्पादन पदरी पड़ेल असेही बियाणे असते. त्यामुळे त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असा सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पहिल्या पेऱ्यातील पिकांचे नुकसान झाले असल्याने आता अधिकचा वेळ आणि पैसा खर्चून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

महत्वाच्या बातम्या;
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांना नोटिसा, रक्कम थकवल्याने आयुक्तांचा दणका
दोन कोटींहून जास्त रेशनकार्ड रद्द, मोदी सरकारच्या मोठा निर्णय..
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का, 'या' जागांवर होणार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका

English Summary: problems farmers understood construction, no time politics, Darekars
Published on: 29 July 2022, 03:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)