संपूर्ण राज्यातील कारागृहाच्या अखत्यारीत असलेल्या जवळ जवळ शेतीच्या 330 हेक्टर क्षेत्रामधूनतीन वर्षांमध्ये चक्क नऊ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
कैद्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे राज्यातील कारागृह प्रशासनाला कोट्यवधींचा नफा मिळाला असल्याने आर्थिकपाठबळ मिळाले आहे. प्रत्येकाच्या अंगामध्ये काहीतरी विशेष कलागुण असतात. त्याला कैदी सुद्धा अपवाद नाहीत. या कैद्यांमध्ये विविध प्रकारचे कलागुण असतात. अशा कैद्यांना त्यांच्यात असलेल्या कलागुणांना हेरून त्या पद्धतीने काम केले जाते. त्यासाठी राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जातात यामध्ये शेती, कारखाने आणि उद्योग यामध्ये कैद्यांना ट्रेनिंग देऊन कामावर ठेवले जाते. जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये एकूण 43 कारागृह असून 9 मध्यवर्ती, 25 जिल्हा, एक महिला कारागृह आणि पाच खुले कारागृह आहेत. एकंदरीत या सर्व कारागृहांचा विचार केला तर यामध्ये 22 हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत.
नक्की वाचा:पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी- ह्युमिक ऍसिड आपल्या घरातच बनवा या पद्धतीने, होइल फायदाच फायदा
हे सगळे कैदी उद्योगधंद्यांमध्ये च नाही तर शेतीमध्ये देखील निरनिराळे काम करतात. जर आपण कारागृहा विभागाचा खर्चाचा विचार केला तर तो खर्च भागवणे मध्ये तीनही हंगामात केली जाणारी शेती महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या कैद्यांना शेतीचे उत्तम ज्ञान आहे अशा कैद्यांकडून फळभाज्या, पालेभाज्या, ऊस, गहू, ज्वारी, तुर आणि केळी सारखे पिके घेतली जातात. जर आपण वर्षनिहाय कारागृहाचा उत्पन्नाचा विचार केला तर दोन हजार अठरा ते एकोणवीस या वर्षात कारागृह विभागाने चार कोटी 9 लाख रुपयांचे उत्पादन घेतले होते तर 2020 मध्ये चार कोटी 38 लाखांची उत्पादन झाले होते. एवढेच नाही तर पुण्यासारख्या कारागृहात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन, शेळी पालन व कुक्कुटपालन सारखी व्यवसाय देखील केले जातात. एवढेच नाही तर सेंद्रिय शेती सुद्धा उत्तम केली जाते व देशी बियाण्यांची पेरणी केली जाते.
नक्की वाचा:अशाप्रकारे बघा शेतीकडे आपल्याला नक्कीच राजा झाल्यासारखं वाटेल
सेंद्रिय शेती करताना त्यावर कुठल्याही प्रकारचा रसायनांचा वापर हे कैदी करत नाहीत. जर आपण कारागृहनिहाय शेती उत्पादनाचा विचार केला तर पैठण खुले कारागृह महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. इथे विविध प्रयोग शेतीत राबवले जातात व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पैठण कारागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भाजीपाला फळे मोठ्या प्रमाणात पिकवली जातो तसेच ऊससुद्धा मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. एवढेच नाही तर हा ऊस जवळच्या साखर कारखान्यांमध्ये पाठवला जात आहे हे महत्त्वाचे आहे.(स्रोत- लोकसत्ता)
Published on: 08 April 2022, 10:01 IST