News

प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojana) निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यावर जमा केला होता.

Updated on 07 April, 2022 5:23 PM IST

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Yojana) निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यावर जमा केला होता. खरिपात शेतकऱ्यांची गरज ओळखून या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.

पीएम किसान योजनेचे 12 कोटींहून अधिक लाभार्थी 11व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या महिन्यात येऊ शकतो. गेल्या वर्षी हा हप्ता 15 मे रोजी आला होता. मात्र, यावेळी रामनवमी किंवा आंबेडकर जयंतीच्या दिवशी येण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
सोयाबीनला अच्छे दिन..! दरात झाली 'इतकी' वाढ; शेतकऱ्यांना होणार फायदा

2018 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. त्याच्या खात्यात वर्षभरात 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते ट्रान्सफर होतात.

आता शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळणार आहे. पण, केवायसी अपडेट झाल्यावरच ते उपलब्ध होईल. अत्यंत अल्पभुधारक शेतकऱ्यास देखील योजनेचा लाभ मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! दूध दरात तब्बल 'इतकी' वाढ
खुशखबर! शेतकऱ्यांचा शेतीमाल बांधावरून थेट सातासमुद्रापार जाणार, असा घ्या योजनेचा लाभ..!

English Summary: Prime Minister Kisan Yojana: It will be collected on 11th day of this week
Published on: 07 April 2022, 05:23 IST