केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, केंद्राकडून 600 पीएम कृषी समृद्धी केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. ही पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्रे देशातील 600 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणारे किसान संमेलन अनेक अर्थांनी खास असणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. ज्या अंतर्गत देशातील सर्व खते शेतकऱ्यांना एकाच (भारत) नावाने उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी पीएम कृषी समृद्धी केंद्रे खूप उपयुक्त ठरतील. रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत. या केंद्रांमध्ये वैज्ञानिक सुविधा, माती परीक्षण, सुधारित बियाणे आणि खते असतील. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये खतांच्या किरकोळ दुकानांचे टप्प्याटप्प्याने वन स्टॉप शॉपमध्ये रूपांतर केले जाईल.
आता जमीन खरेदीसाठी सरकार देणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या सविस्तर..
ज्याला प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (PMKSK) असे नाव देण्यात आले आहे. ही केंद्रे देशातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करतील. प्रायोगिक टप्प्यात प्रत्येक जिल्हा स्तरावर किमान एक किरकोळ दुकान मॉडेल शॉपमध्ये रूपांतरित केले जाईल. भविष्यात, 3,30,499 किरकोळ खतांची दुकाने PMKSK मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
आज स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी काय घोषणा करणार? ऊस उत्पादकांचे लागले लक्ष
भारत सरकार खत कंपन्यांना त्यांच्या मालाची भारत या ब्रँड नावाने विक्री करणे बंधनकारक करत आहे जेणेकरून खतांचे ब्रँड देशभरात प्रमाणित केले जाऊ शकतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान भारत युरिया बॅगचे लोकार्पण करतील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना ३० हजारांपर्यंतची मदत
पावसामुळे टोमॅटोची आवक घटली, दरात 10 ते 15 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा...
16 व्या पॅन-आशिया शेतकरी प्रोग्राममध्ये बायोटेक कॉर्न उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद, आधुनिक शेतीचा होतोय फायदा..
Published on: 15 October 2022, 05:03 IST