News

गेल्या काही दिवसात जसे पेट्रोलचे दर वाढत आहेत तसेच टोमॅटोचे दर देखील वाढत आहेत. टोमॅटो कधी फेकून द्यावा लागतो तर कधी फेकलेला विकला तरी मालामाल करतो. आता त्याची तुलना थेट ( Petrol Rate ) पेट्रोलशीच केली जाऊ लागली आहे. यामुळे खरेदी करणारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Updated on 30 May, 2022 10:15 AM IST

गेल्या काही दिवसात जसे पेट्रोलचे दर वाढत आहेत तसेच टोमॅटोचे दर देखील वाढत आहेत. टोमॅटो कधी फेकून द्यावा लागतो तर कधी फेकलेला विकला तरी मालामाल करतो. आता त्याची तुलना थेट ( Petrol Rate ) पेट्रोलशीच केली जाऊ लागली आहे. यामुळे खरेदी करणारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या टोमॅटोने आता शंभरी पार केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीचेही कष्ट घेतले नव्हते. ते तोडणेही परवडत नव्हते. तर यंदा (Mumbai Market) बाजारपेठेतच नाही तर शेतामध्येही टोमॅटो पाहवयास मिळत नाही अशी स्थिती आहे. उत्पादनात घट आणि वाढलेली मागणी यामुळे दरात विक्रमी वाढ झाली आहे. पण याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना नसून व्यापाऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना हा नेहेमीप्रमाणे अन्याय आहे.

टोमॅटोबाबत दरवर्षी होणारे नुकसान पाहता लागवड क्षेत्रात मोठी घट झाली. कोरोना काळापासून याला बाजार नसल्याने अनेकांनी यावेळी ते लावणेच पसंद केले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत कायम टोमॅटोची आवक ही कमीच राहिलेली आहे. वाढती मागणी घटलेला पुरवठा यामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये दरामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे देखील अनेकांचे पीक वाया गेले.

'बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम'

यामुळे गेल्या आठवड्यात टोमॅटो 30 रुपये किलो होता तर आता 110 रुपये किलो आहे. असे असले तरी ग्राहक आणि शेतकऱी यांच्यातील मध्यस्तीची भूमिका निभवणाऱ्या व्यापाऱ्यांचाच अधिकचा फायदा होत आहे. कमी आवक असल्याने बाजारपेठेत टोमॅटोचा कृत्रिम तुटवडा तर मागणी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केली जाते. यामुळे व्यापाऱ्यांची शाळा चालूच आहे.

आता आठच दिवसात लठ्ठपणा कमी करा, संशोधनानंतर वजन कमी करणारांसाठी आनंदाची बातमी

यामुळे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे सध्या दरवाढीचा गाजावाजा होत असला तरी खरी मिळगत ही व्यापाऱ्यांचीच आहे शेतकऱ्यांची नाही. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळावेत असे व्यापाऱ्यांना वाटत नाही. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अजून या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
हवामान अपडेट: शेतकऱ्यांनो आजपासून मान्सून होणार दाखल, केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु..
IoTech World Avigation कंपनीने लॉन्च केला सर्वोत्तम बाइक ड्रोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
लाव वशिला! सरपंचाने केले स्वतःच्या मुलाला ग्रामपंचायतीचा शिपाई, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता...

English Summary: prices tomatoes petrol are same, farmers traders and traders
Published on: 30 May 2022, 10:15 IST