News

पं.दे. कृ. वि. अकोला- संत्रा फळगळ अभ्यास समिती सभा झाली संपन्न

Updated on 08 September, 2022 9:31 PM IST

पं.दे. कृ. वि. अकोला- संत्रा फळगळ अभ्यास समिती सभा झाली संपन्न कृषि विद्यापीठे, केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्था, राज्य शासनाचा कृषि विभाग व प्रत्यक्ष संत्रा बागायतदार शेतकरी यांनी संयुक्तरीत्या संत्रा फळगळ व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना केल्यास या समस्यांचे निराकरण करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरु तथा संत्रा फळगळ समितीचे अध्यक्ष डॉ. विलास भाले, यांनी केले. संत्रा फळगळीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, केंद्रीय

लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर कृषि विभाग व प्रगतशील संत्रा बागायतदार शेतकरी यांचा समावेश असलेल्या अभ्यास समितीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या सभेच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.He was speaking while guiding the meeting from the chairmanship.डॉ भाले यांनी संत्रा फळगळ समस्येवर संदेश (ॲडव्हायझरी) देताना हवामानाच्या अंदाजानारूप प्रसारित करण्या बाबत सूचना दिल्या

हे हि वाचा - जाणून घ्या हानिकारक उधळी (वाळवी ) कीटक आणि व्यवस्थापन

 तसेच संत्रावाण विकास प्रक्रियेमध्ये विद्यापीठ व केंद्रीय संस्था यांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देशित केले. शेतकऱ्यांना उत्तमप्रतीच्या फळांसाठी बहाराअनुरूप एका झाडावर किती फळे ठेवावी व त्याचे शास्त्रीय

व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्याचे सुचविले. विभागातील उत्पादकता व उत्पादन वाढीचा तसेच विक्री व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे निर्देशित केले. या समितीच्या सभे मध्ये डॉ. दिलीप घोष, संचालक केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्था, नागपूर, डॉ. एस. एस. माने, संशोधन संचालक तथा विभाग प्रमुख वनस्पती रोप शास्त्र विभाग, डॉ. डी. बी. उंदीरवाडे. संचालक विस्तार शिक्षण तथा विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पी. के. नागरे, सहयोगी अधिष्ठाता. कृषी महाविद्यालय, अकोला, श्री के, एस, मुळे, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती, श्री आर,

डी, साबळे विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर, डॉ, एस. जी. भराड, विभागप्रमुख फळशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवी.,अकोला, श्री मनोज जवंजाळ, श्री रमेश जीचकार, संत्रा प्रगतशील शेतकरी, डॉ. दास, प्रमुख शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. मेश्राम वरिष्ठ शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपूर, डॉ. डी. एच. पैठणकर, प्रभारी अधिकारी, अ.भा.स. प्र. (फळे), डॉ. पंदेकृवी., अकोला, डॉ. एन. आर. कोष्टी, मा. कुलगुरू यांचे तांत्रिक सचिव, डॉ. व्ही.यु. राऊत, प्राध्यापक, उद्यानविद्या तथा अध्यक्ष, उपसमिती नागपूर विभाग, डॉ. ए. वाय.

ठाकरे, अध्यक्ष, उपसमिती अमरावती विभाग, डॉ. एम एच डहाळे, उद्यानविद्यावेत्ता, प्रा.फ.सं.के, काटोल यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीला विद्यापीठाने संत्रा फळगळीस कारणीभूत असलेल्या विविध समस्येवर तसेच त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनावर सोबतच प्रथम सभेमध्ये झालेल्या निर्णयावर कार्यवाही अहवाल आणि विद्यापीठाच्या वतीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत असलेल्या संशोधनात्मक तसेच विस्तार विषयक कार्याबाबत सादरीकरण विभाग प्रमुख, फळशास्त्र विभाग डॉ. शशांक भराड यांनी केले. या अभ्यास समितीच्या

अंतर्गत स्थापन केलेल्या उपसमिती – नागपूर विभाग व उपसमिती अमरावती विभाग यांच्या चमू प्रमुखांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देणे, शेतीशाळा, मासिक संदेश नुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे, सततच्या पावसामुळे संत्रा फळबागेवर होणारा दुष्परिणाम इत्यादी बाबत विभागात केलेल्या कार्यांचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला.विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर आणि अमरावती यांनी त्याच्या विभागा मार्फत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना विद्यापीठ व केंद्रीय संस्था यांच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आले तसेच शेतीशाळा, मासिक/पाक्षिक संदेश, प्रक्षेत्र

भेटी इत्यादी तसेच या समस्येवर उपाययोजना करण्या बाबत कृषि विभाग करत असलेल्या कार्याबाबत माहिती डॉ. घोष,संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्था, नागपूर यांनी दिली. फळगळ बाबत संस्थेने केलेल्या विविध संशोधनात्मक तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकरिता घेतलेल्या प्रशिक्षण व वेळोवेळी पाक्षिक संदेश व शेतकरी कार्यशाळा घेण्यात आल्या बाबतची माहिती दिली.श्री. मनोज जवंजाळ, प्रगतिशील शेतकरी, नागपुर

यांनी पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होण्याच्या दृष्टीने संस्करण करणे, जमिनी मधील कर्बांचे प्रमाण वाढविणे आणि जैविक व अजैविक ताण याबाबतीत शेतकऱ्यांन मध्ये जागृती व मार्गदर्शन करणे त्याचप्रमाणे बदलत्या हवामानारूप संत्रा वाण विकसित करण्याच्या दृष्टीने कार्य होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सोबतच, श्री रमेश जिचकार, प्रगतशील शेतकरी,जि. अमरावती यांनी

संत्रा अधिका-अधिक देशांमध्ये निर्यात होण्याच्या दृष्टीने फळांची गुणवत्ता व निर्यातीच्या निकषानुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा व संत्रा निर्याती संदर्भात अभ्यास करणे त्याचप्रमाणे नवीन वाण विकसित होण्याच्या दृष्टीने सर्व संस्थेकडून सामुहिक प्रयत्न करणे गरज असल्याचे मत व्यक्त केले.समितीच्या बैठकीचे सूत्र संचालन विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवर सदस्यांचे आभार डॉ. यु. ए. राऊत यांनी व्यक्त केले.

English Summary: Prevent orange fruit rot in an integrated manner - Vice Chancellor Dr. Luxury spears
Published on: 08 September 2022, 05:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)