गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे आता कारखान्यांवर ताण आला असून अनेकांचे ऊस अजूनही फडतच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. यावर आता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे. पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल. असे शरद पवार म्हणाले. शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच ते म्हणाले, ब्राझील अमेरिकासारख्या देशात इथेनॉलचा वापर जास्त करतात आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल असेही पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी वाढत्या उसाच्या शेतीबद्दल काळजी व्यक्त केली. मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील असे दिसत असल्याचे पवार म्हणाले. पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल.
केवळ उसापासून साखर असा विचार करुन आता चालणार नाही. साखरेच्या कर्जाचे व्याज कारखान्यावर येतं, त्यामुळं वेगळं काही करता येत का हे पाहावं लागेल. उसाची शेती इतकी वाढायला लागली की गाळप कसे करायचे हा प्रश्न आहे. अतिरिक्त ऊस, सध्याचा शिल्लक ऊस याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून मी याबाबत माहिती घेतो, असेही ते म्हणाले.
कारखाने मे अखेरपर्यंत चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी दिसल, वावर दिसल की तुम्ही कांडी लावल्याशिवाय राहत नाही, तुम्ही दुसऱ्या पिकाकडे जात नाही. खात्रीचे पैसा देणारे पीक म्हणून उसाकडे बघतो. पण आता साखर एके साखर करुन चालणार नाही. दुसरा विचार करावा लागेल असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यात सध्या अनेक शेतकऱ्यांचे ऊस शिल्लक राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या;
डिझेल दरवाढीमुळे मशागत महागली, दरवाढीचे कारण देत केली जातेय लूट, वाचा काय आहे एकरी दर
शेतकऱ्यांनो शेततळे अनुदानात झालीय वाढ, भविष्याचा विचार करून आताच करा सोय, 'असा' करा कर्ज
'नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपयांची भरपाई द्यावी'
Published on: 02 April 2022, 03:07 IST