राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना आता निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांची मान्यता रद्द (Cancellation Of Recognition Of Political Parties) केली आहे. तसेच, त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवले आहे. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये भारतीय आवाज पार्टी, वॉर वेतरणा पार्टी, जनादेश पक्ष, न्युज काँग्रेस, पीपल्स पॉवर पार्टी, राष्ट्रीय लोक जागृती पार्टी, शेतकरी विचार दल, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, विदर्भ विकास पार्टी, विदर्भ राज्य पार्टी यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आहे.
इतर राज्यातील देखील अनेक पक्षांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये (Shivsena Vs Shinde Group) पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण (Bow-Arrow) आपल्याकडेच रहावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) धाव घेतली आहे.
राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी, शिंदे सरकारची मोठी घोषणा
असे असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या गटाला द्यावे अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, शिवसेनेने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणूक अयोग्य घेऊ शकत नाही, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
सहकार मंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
अजब गजब कारभार! ग्राहकाला आले तब्बल 3419 कोटींचे वीजबिल, आकडा ऐकून ग्राहक रुग्णालयात
काय सांगता! खोदलेली विहीर गेली चोरीला, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार...
Published on: 27 July 2022, 03:21 IST