पोस्ट ऑफिसच्या योजनांचा अनेक लोक लाभ घेत असतात. आजही या योजना लोकप्रिय बनत चालल्या आहेत. भारतातील सर्वसामान्य लोक पैशांची बचत करू शकतील या हेतूने भारतीय पोस्ट काम करत आहे. बचत करू शकणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक योजना ऑफर करते.
ग्रामीण डाक जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत, पोस्ट ऑफिसने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी ग्राम सुरक्षा या योजनेला अनेकांनी पसंती दिली आहे. पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
ग्राम सुरक्षा योजनेची मुख्य वैशिष्ट्ये, फायदे आणि पात्रता –
* प्रवेशासाठी किमान आणि कमाल वय 19 ते 55 वर्षे निश्चित केले आहे
* किमान विमा रक्कम 10,000 रुपये; कमाल 10 लाख रुपये
* चार वर्षांनी कर्जाची सुविधा
* पॉलिसीधारक तीन वर्षांनी सरेंडर करू शकतो
* 5 वर्षापूर्वी समर्पण केल्यास ही योजना बोनससाठी पात्र नाही
* विमाधारकाच्या वयाच्या 59 वर्षापर्यंत एन्डॉवमेंट अॅश्युरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते जर रूपांतरणाची तारीख प्रीमियम भरण्याच्या तारखेपासून किंवा मुदतपूर्तीच्या तारखेच्या एका वर्षाच्या आत येत नसेल तर हा फायदा मिळतो.
* प्रीमियम भरण्याचे वय 55, 58 किंवा 60 वर्षे निवडले जाऊ शकते
* पॉलिसी सरेंडर केल्यास कमी विमा रकमेवर आनुपातिक बोनस दिला जातो
* शेवटचा घोषित केलेला बोनस- प्रति वर्ष 1000 रुपये प्रति वर्ष विमा रक्कम 60
मोफत रेशन मिळण्यास अडचण येतेय? तर घरी बसून त्वरित करा तक्रार; गहू - तांदूळ मिळतील घरपोच
50 रुपये गुंतवून मिळवा 35 लाख रुपये -
ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला प्रत्येक महिन्याला फक्त 50 रुपये जमा करून 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळवू शकतो. जर व्यक्तीने प्रत्येक महिन्याला पॉलिसी अंतर्गत 1,515 रुपये गुंतवले, जे दररोज 50 रुपये आहे, तर पॉलिसीचे मूल्य 10 लाख रुपये असल्यास, त्या व्यक्तीला त्याच्या मुदतपूर्तीनंतर 34.60 लाख रुपयांचा परतावा मिळेल.
महत्वाच्या बातम्या:
Donald Trump wife: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन
Rain Update: पुणे वेधशाळेने पावसाबाबत दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा...
Published on: 15 July 2022, 02:05 IST