चांगल्या भविष्यासाठी सर्वसामान्य लोकांना पैशांची बचत करणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) काही योजना माहिती असणे गरजेचे आहे. ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा (long term investment) विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योजना योग्य आहे. 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी' मध्ये दरमहा काही पैसे गुंतवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. शेतकरी आणि इतर सर्व सामान्य लोक कोणीही या गुंतवणूक योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीपीएफचे (open a Provident Fund) वैशिष्ट्य सांगायचे झाले तर त्यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. शेअर बाजारातील अस्थिरतेचा पीपीएफ गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. पीपीएफचे व्याजदर सरकार दर तिमाहीत ठरवते.
इतके मिळते व्याज
भारतीय पोस्ट ऑफिसला सध्या PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. पीपीएफवरील व्याज हे बँकेतील मुदत ठेवींपेक्षा नेहमीच चांगले असते. भविष्यातील बचतीसाठी पीपीएफमधील गुंतवणूक आवश्यक आहे.
कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या (Nationalized or Private Banks) कोणत्याही शाखेत भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडू शकते. PPF खाते फक्त 500 रुपये जमा करून उघडता येते. भविष्य निर्वाह निधी खात्यात दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते
ही 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह दीर्घकालीन योजना आहे. तुम्ही पीपीएफमधील गुंतवणूक मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्ही PPF खात्यात 15 वर्षांसाठी दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. तुमची गुंतवणूक रक्कम 15 वर्षांत 22.50 लाख रुपये होईल.
जर तुम्हाला PPF मध्ये गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर 15 वर्षांनंतर तुम्हाला 5-5 वर्षांसाठी दोनदा गुंतवणूक वाढवावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 25 वर्षांसाठी दरमहा 12500 रुपये गुंतवावे लागतील. 25 वर्षांनंतर तुम्हाला 1.03 कोटी रुपये मिळतील.
Published on: 27 July 2022, 12:30 IST