सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. नाशिक मधील लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून डाळिंबाचे लिलाव सुरू झाले आहेत. आता येथे डाळिंब लिलावास प्रारंभ करण्यात आला.
पहिल्या दिवशी दिवसभरात २९९ क्रेट आवक झाली. प्रतिक्रेट किमान २०० ते कमाल ५१०० व सरासरी २०११ रुपये याप्रमाणे दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
डाळिंबाच्या कॅरेटला सरासरी २ हजार ११ रुपये एवढा भाव मिळाला. यामध्ये वजन मापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असून, स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल.
साखरेचे भाव वाढण्याचा अंदाज, कारण..
दिवसभरात २९९ क्रेट आवक झाली. प्रतिक्विंटल बाजारभाव किमान २०० ते कमाल ५१०० व सरासरी २०११ रुपये याप्रमाणे मिळाला. परिसरातील उत्पादित मालाच्या विक्रीची सोय व्हावी, म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या ९ वर्षांपासून डाळिंब लिलाव करण्यात येतात.
राज्यात मोठा दुष्काळ पडणार? मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस
याठिकाणी चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नर, नगर जिल्ह्यांतील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा येथून डाळिंब येत आहेत. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर डाळिंब उत्पादक शेतकरी झाले आहेत.
तुमच्या बागेत ही पाच झाडे लावा, तुमच्या घराची हवा पूर्णपणे करतील स्वच्छ
३५ हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत, 6 लाखांचे बिल काढण्यासाठी केली होती पैशांची मागणी...
कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
Published on: 13 July 2023, 11:51 IST