News

कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीठ, तर कधी वादळी वारे, यामुळे शेतकऱ्यांचे पूर्वनियोजन विस्कळीत होते. या अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान होते.

Updated on 26 May, 2022 4:54 PM IST

राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे फळ बागायतदारांना चांगलाच फटका बसला आहे. सिझनच्या सुरूवातीपासून डाळिंब बागायतदारांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यात आता चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे डाळिंब बागायतदारांचे बरेच नुकसान झाले आहे. डाळिंब उत्पादनातील बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याचे नाव समोर येते.

मात्र वाढत्या पिनहोल बोअर किडींच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून डाळिंब फळाला नुकसान सहन करावे लागत आहे.अवकाळी पाऊस तसेच अति तापमान यामुळे फळांचा बाजारात दर्जादेखील कमी झाला होता. शेतकरी बंधू शेती व्यवसाय करताना पूर्वनियोजन आणि योग्य व्यवस्थापन करत असतात. मात्र नैसर्गिक संकंटांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अमाप नुकसान होते.

कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीठ, तर कधी वादळी वारे, यामुळे शेतकऱ्यांचे पूर्वनियोजन विस्कळीत होते. या अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान होते. फळ पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. काहींनी तर लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र वाढत्या तापमानामुळे फुलकळी लागताच ती खाली गळून पडत आहे.

शॉर्टसर्किटमुळे महिला शेतकऱ्याच्या दोन गायी दगावल्या;भरणे मामांची थेट 50 हजाराची मदत

फळांवर पिनहोल बोअर किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. यातून डाळिंब फळाचे अति नुकसान होत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मदतीची विनंती करत आहेत. सोलापूर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ही तेच चित्र आहे. तापमान ४० च्या पुढे गेल्याने डाळिंबाची झाडे खराब झाली आहेत,

वाढत्या तापमानामुळे इतर पिकांचे तसेच फळांचेही नासाडी होत आहे. उन्हाच्या तडाख्याने फळांवर पांढरे डाग पडून बाजारातील त्याचा दर्जा कमी होत आहे. त्यामुळे उन्हापासून फळे वाचवण्यासाठी शेतकरी खटाटोप करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी फळांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी घरातील जुन्या साड्या आणि कपडे वापरून छोटी झाडे झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय कीटकनाशकांची फवारणीही करत आहेत. शेतकरी रात्रीच्या वेळी फळबागांना पाणी घालून उन्हाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

किडींचा वाढता प्रादुर्भाव -

यंदा डाळिंब बागांवर पिनहोल बोअर किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या फळबागा नष्ट कराव्या लागल्या. या किडींमुळे
सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब बागायतदारांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कृषी विभागाने यासाठी नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो असा प्रयोग का करत नाही? भाव नव्हता म्हणून पठ्ठ्यांनी परदेशात विकला कांदा, झाले मालामाल
women farmer's success: महिला शेतकऱ्याची कमाल! चक्क गायीच्या शेणापासून तयार केला नैसर्गिक कलर

English Summary: Pomegranate growers desperate; The series of crises continued
Published on: 26 May 2022, 04:54 IST