News

Police Bharati 2022: येत्या काही दिवसात होणारी पोलिस भरती पुढे ढकलली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

Updated on 29 October, 2022 4:39 PM IST

येत्या काही दिवसात होणारी पोलिस भरती पुढे ढकलली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहिती आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती पुढे ढकलली असल्याचं सांगण्यात येतंय. आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

देशातील 10 हून अधिक राज्यांमध्ये 4 दिवस पाऊस पडणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे.

कुठे किती जागा आहेत?

मुंबई - 6740
ठाणे शहर - 521
पुणे शहर - 720
पिंपरी चिंचवड - 216
मिरा भाईंदर - 986

नागपूर शहर - 308
नवी मुंबई - 204
अमरावती शहर - 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई - 620
ठाणे ग्रामीण - 68

रायगड -272
पालघर - 211
सिंधूदुर्ग - 99
रत्नागिरी - 131
नाशिक ग्रामीण - 454
अहमदनगर - 129
धुळे - 42
कोल्हापूर - 24
पुणे ग्रामीण - 579
सातारा - 145
सोलापूर ग्रामीण  - 26

औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड - 155
परभणी - 75
हिंगोली - 21
नागपूर ग्रामीण - 132
भंडारा - 61
चंद्रपूर - 194
वर्धा - 90
गडचिरोली - 348
गोंदिया - 172
अमरावती ग्रामीण - 156
अकोला - 327
बुलढाणा - 51
यवतमाळ - 244
लोहमार्ग - 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण - 14956

राज्यात १० नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने ऊस गाळप होणार

English Summary: Police Bharti 2022: Suspension of police recruitment
Published on: 29 October 2022, 04:38 IST