News

आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावला व यावेळी 21 तोफांची सलामी देखील देण्यात आली. यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना देशासमोर पाच संकल्प ठेवले. या संकल्पांची या लेखांमध्ये आपण माहिती घेऊ.

Updated on 15 August, 2022 11:00 AM IST

आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावला व यावेळी 21 तोफांची सलामी देखील देण्यात आली. यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना देशासमोर पाच संकल्प ठेवले. या संकल्पांची या लेखांमध्ये आपण माहिती  घेऊ.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलेली 5 संकल्प

1- पहिला संकल्प- यामध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी पहिला संकल्प दिला तो म्हणजे, मोठ्या संकल्पाने देश आता पुढे जायला हवा व  जात असताना खूप मोठी जिद्द घेवून चालायचे आहे.

नक्की वाचा:Independence Day 2022 : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

2- दुसरा संकल्प- यामध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की जर आपल्या मनामध्ये अजून देखील गुलामगिरीचा छोटासा जरी भाग मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पळवावे लागेल. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल.

3- तिसरा संकल्प- प्रत्येक भारतीयाला आपल्या वारशाचा अभिमान असायलाच हवा. कारण हा तो वारसा आहे ज्याने कधीकाळी भारताला सुवर्ण काळ दिला. त्यामुळे या वारशाचा आपल्याला अभिमान असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे महत्त्वाच्या भारतीय वारशाचा अभिमान  ठेवणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:केंद्र सरकार ऍक्शन मोडवर! तूरडाळीच्या साठ्याची माहिती साठेधारकांना आता द्यावीच लागणार

4- चौथा संकल्प- चौथा संकल्प देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 135 कोटी देशामध्ये एकता असणे खूप गरजेचे असून ना स्वतःचा ना कोणी परका ही भावना ठेवून एकतेची शक्ती ही एक श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपली चौथी महत्त्वाची प्रतिज्ञा आहे.

5- पाचवा संकल्प- यामध्ये त्यांनी नागरिकाचे कर्तव्यं विषयी संबोधन केले. त्यावेळी ते म्हणाले की, नागरिकाचे कर्तव्य मध्ये, नागरिक मध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा देखील समावेश होतो कारण ते देखील नागरिक आहेत.

येणाऱ्या पंचवीस वर्षांमध्ये स्वप्न पूर्ण करणे ही एक मोठी प्राणशक्‍ती असून जेव्हा आपली स्वप्ने मोठी होतात, जेव्हा विचार मोठी असतात तेव्हा प्रयत्नदेखील खूप मोठे असतात. त्यामुळे देशाच्या बाबतीत असलेली नागरिकांची कर्तव्य म्हणजे आपली कर्तव्य जपणे देखील महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा

English Summary: pm narendra modi give five volition to every indian while addresing to india
Published on: 15 August 2022, 11:00 IST