शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वास्तव चित्र काही वेगळंच आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पीएम शेतकरी योजना नसून ती एक छळ योजना आहे. अशा शब्दात त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.
पीएम 'शेतकरी छळ योजना'. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी वेदनाच दुप्पट केल्या जात आहेत.असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत बळीराजाचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्याऐवजी शेतकऱ्यांच्या वेदनाच दुप्पट झाल्या आहेत अशा शब्दात मोदी सरकारवर त्यांनी टीका केली आहे.
तसेच हे सरकार भांडवलदारांच्या फायद्यासाठी काम करत आहे असंही ते म्हणाले. सोमवारी ट्विट करत सध्या देशात 'पीएम 'शेतकरी छळ' योजना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सांगितली जात नाही. 'मित्रांचे' कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही.
शेतकऱ्यांना MSP'चे खोटे आश्वासन दिले गेले तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना काढण्यात आली. प्रत्येक्षात मात्र विम्याच्या नावावर विमा कंपन्यांनाच 40,000 कोटींचा लाभ मिळाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
पिकांचे स्वास्थ्य ठेवायचे आहे ना? तर मातीचे आणि पाण्याचे स्वास्थ्य ठेवा ठीक, वाचा विश्लेषण
भारीच की! शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा शेती आणि 3 महिन्यात लखपती व्हा, जाणून घ्या.
Published on: 26 July 2022, 05:37 IST