News

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत मोठा आमूलाग्र बदल केला आहे. मध्यंतरी या योजनेचा अनेक बोगस शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले होते त्या अनुषंगाने केंद्र सरकारने अशा बोगस शेतकऱ्यांना आळा बसवण्यासाठी या योजनेत मोठा बदल करून आता या योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

Updated on 11 March, 2022 6:33 PM IST

आता या योजनेचा 11 वा हफ्ता प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांना केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण वीस हजार रुपये देण्यात आले आहेत अर्थात या योजनेचे दहा हफ्ते शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या योजनेचा अकरावा हप्ता एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेचा अकरावा हफ्ता प्राप्त करण्यासाठी एक केवायसी करणे बंधनकारक आहे, यासंदर्भात पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देखील देण्यात आली आहे.

या योजनेचे पात्र शेतकरी बांधव देखील अकरावा हफ्ता मिळावा म्हणुन केवायसी करण्यासाठी धडपड करत असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, शेतकरी बांधवांना केवायसी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी बांधवांना केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटर अर्थात आपले सेवा केंद्र वर तासन्तास बसावे लागत आहे. पीएम किसान योजनेची वेबसाईट कधी जॅम असते तर कधी केवायसी करताना अचानक साईट बंद होते. याव्यतिरिक्त अनेक शेतकरी बांधवांचे बोटाचे ठसे उमटत नाही त्यामुळे अशा शेतकरी बांधवांची ई-केवायसी होत नाहीये.

आता अकरावा हप्त्याची तारीख देखील जवळ येत आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पात्र असून देखील अकरावा हप्ता मिळेल की नाही याबाबत मोठी संभ्रमावस्था आहे. एप्रिल महिन्यात या योजनेचा पुढचा हप्ता अर्थात अकरावा हफ्ता दिला जाणार आहे. हा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक असणार आहे, नाहीतर आगामी हप्ता पात्र असून देखील शेतकऱ्यांना दिला जाणार नाही असे सांगितले जात आहे.

हेही वाचा:-

Onion Rate: कांद्याच्या दरात मोठी घसरण; पण युद्धामुळे दरात घसरण नाही तर……!

Teakwood Farming: एका एकरात सागाचे 400 झाडे लावा आणि कमवा एक कोटी रुपये; कसं ते जाणून घ्या इथं

Pm Kisan Yojna: होळीला शेतकऱ्यांचे तोंड होणार गोड कारण की, केंद्र सरकार

English Summary: pm kisan yojna farmers are facing a lots of problem for doing e kyc
Published on: 11 March 2022, 06:31 IST