केंद्र सरकारने अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत केली जाते. पण राज्यातील गरजू व्यक्तींऐवजी अपात्र शेतकऱ्यांनीच फायदा घेतल्याचे समोर आले आहे. राज्यातील २८ जिल्ह्यात हा घोळ झाला असल्याचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे. राज्यातील २८ जिल्ह्यातून २ लाख ५१ हजार ९८२ शेतरी अपात्र आहेत.
दरम्यान या शेतकऱ्यांची चौकशी सुरू झाली असून त्यांच्याकडून तब्बल १९३ कोटी ६६ लाख रुपये वसूल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नावावर जमीन नसलेल्यांपासून गल्लेलठ्ठ पगार घेणारे सरकारी अधिकरीही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार लाभार्थी बोगस आहेत. विदर्भात ५२ हजार, पश्चिम महाराष्ट्रात ७९ हजार तर उत्तर महाराष्ट्रात ३९ हजार बोगस लाभार्थी आढले आहेत.
काय आहेत पीएम किसान योजनेचे निकष
दोन हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास प्रति दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. राज्यात डिसेंबर २०१८ फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. दर चार महिन्याला हे पैसे खात्यात जमा होतात.
हेही वाचा : पीएम किसान योजनेचा घोळ : कोणी लाटला मृत शेतकऱ्यांचा पैसा तर कोणी आहे प्राप्तीकर भरणारे धनी
दरम्यान अर्जात काही गैर प्रकार अथवा काही चुकीची माहिती असल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहीन, असे संबंधित शेतकऱ्याकडून लिहून घेतलेले आहे. त्यामुळे रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. यासह महा ई-सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. या योजनेसाठी काम करणाऱ्या व माहिती घेण्यात हलगर्जी करणाऱ्या महा ई- सेवा केंद्रांवर कारवाई सुरू झाली आहे.
जिल्हा |
बोगस लाभार्थी | वसूल केली जाणारी रक्कम |
रत्नागिरी | ५,६०० | २ हजार ११ कोटी |
मराठवाडा - औरंगाबाद | ७, ५१६ | ७.९ कोटी |
नांदेड | ९,९८५ | ७.४३ कोटी |
बीड | ३१,६६९ | १४.२७ कोटी |
लातूर | ८, ५५१ | ८ कोटी |
परभणी | ४, ६७७ |
४.२४ कोटी |
जालना | ५,१२२ | ४.७५ कोटी |
नाशिक | ११ , ८५४ | ११.१० कोटी |
नगर | २७ , ९६३ | २२ कोटी |
धुळे | ७ , ७२७ | ७ कोटी |
जळगाव | १३, १७२ | १२.४८ कोटी |
नंदुरबार | १, ७४६ | १.७१ कोटी |
पुणे | १६,११८ | १४.०७ कोटी |
कोल्हापूर | १३,४३७ | १३.२६ कोटी |
सांगली | १४,२६७ | ११.३५ कोटी |
सातारा | १९,०६६ | ११.४३ कोटी |
सोलापूर | १६,२१० | १५.१६ कोटी |
अकोला | ७,१०४ | ४.८९ कोटी |
भंडारा | ३, २१३ | २.६६ कोटी |
चंद्रपूर | ३ ,४६५ | ३.४४ कोटी |
गडचिरोली | ९१० | ८३.३४ लाख |
यवतमाळ | १५ हजार | ३ कोटी |
गोंदिया | ३,१७१ | ३.५७ कोटी |
वाशिम | १, ७२९ | १.५४ कोटी |
वर्धा | ४,३६६ | ५,३३ कोटी |
बुलडाणा | ५,९८६ | ५.३३ कोटी |
अमरावती | ७,६०३ | ५.८८ कोटी |
Published on: 05 November 2020, 02:49 IST