पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय झालेली योजना आहे. सध्या ही योजना घो़टळ्यामुळे अजून चर्चित आली आहे. दरम्यान पीएम किसान योजनेविषयीची अजून मोठी बातमी हाती आली आहे. या वृत्तामुळे अनेकांची धक्का बसणार आहे. ही धक्कादायक बातमी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. तोमर यांनी सांगितले आहे, की या योजनेतून देण्यात येणारी रक्कम वाढविण्यात येणार नाही. याविषयीचा कोणताच प्रस्तावच आला नसल्याचे स्पष्टीकरण तोमर यांनी मंगळवारी लोकसभेच्या सत्रात बोलत होते.
दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ हजार २८२ रुपये पाठविण्यात आली आहे. यासह तोमर म्हणाले की, या योजनेतून देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा कोणताच प्रस्ताव आलेला नाही. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यात ६ हजार रुपये पाठविले जातात. दरम्यान महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा गेला नसल्याची माहितीही तोमर यांनी दिली. याविषयीची तक्रार केंद्राकडे आल्याची पृष्टी त्यांनी दिली आहे.
हेही वाचा : PM Kisan Samman Nidhi Yojana: लवकरच खात्यात येणार दोन हजार रुपये; पण 'ही' चुकी करा दुरुस्त
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहावा हप्ता पाठवला आहे. तर सातवा हप्ता पाठविण्याची तयारी सरकारकडून सुरू झाली आहे. देशभरातून बिहारमधील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला असल्याचे माहिती खुद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.दरम्यान या योजनेचा अर्ज भरताना अनेक शेतकरी चुकी करत असतात. अर्जात नाव लिहिताना नाव चुकवत असतात. बऱ्याच वेळा आधार कार्ड आणि अर्जातील नावात बदल असतो. कधी कधी बँकेशी आधार कार्ड जोडलेले नसते. या चुकांमुळेही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा येत नाही.
Published on: 17 September 2020, 06:51 IST