PM kisan: देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Goverment) विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे देशातील लाखों शेतकऱ्यांना (Farmers) या योजनांचा फायदा होत आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. कारण या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये दिले जात आहेत.
पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmers Bank Account) ३ हफ्त्यांमध्ये वर्ग केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना ११ हफ्त्यांची सोडत करण्यात आली आहे. लवकरच १२व्या हफ्त्याची (12th installment) सोडत करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी लाभार्थ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही तर त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. त्यासाठी सरकारने ३१ जुलै ही अंतिम मुदतही निश्चित केली आहे. या तारखेपूर्वी ई-केवायसी न केल्यास शेतकरी पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
असे करा ई-केवायसी पूर्ण
1.सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
2.येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल, जेथे ई-केवायसी टॅबवर आहे.
3.आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
4.आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
5.OTP वर सबमिट करा.
6.आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.
पिकांना येणार सोन्याचा मोहर! फक्त ही 10 खते वापरा आणि मिळवा भरघोस उत्पन्न; करा असा वापर...
अवैध लाभार्थ्यांना नोटिसा जारी
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातात. मात्र, दरम्यानच्या काळात पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता अशा बेकायदेशीर लाभार्थ्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात येत आहेत. नोटिसा पाठवण्याची ही प्रक्रिया अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अवैध लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसे परत न केल्यास अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात पक्षी येताच वाजते घंटा, इंजिनिअरही या जुगाडासमोर फिक्के
वाह क्या बात है! फक्त 15 हजार गुंतवले आणि 15 लाख कमावतोय हा शेतकरी; मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव
Published on: 24 July 2022, 10:24 IST