News

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे यामधून लवकरच सुटका मिळण्याची शक्यता आहे. आता पेट्रोल डिझेल संपणार. त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार आहे.

Updated on 04 June, 2022 6:08 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे यामधून लवकरच सुटका मिळण्याची शक्यता आहे. आता पेट्रोल डिझेल संपणार. त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार आहे. यामुळे हे नेमकं आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाणी आणि बायो मासपासून ग्रीन हायड्रोजन तयार होतो. प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाला तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल, असं गडकरी म्हणाले. यामुळे आता तो कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की साखरेचे दर कमी होऊन पंचवीस- सव्वीस रुपये प्रति किलो इतके कमी होतील. कारण इथेनॉलशी संबंधित हा उद्योग आहे.

फ्लेक्स इंजिनमध्ये 100 टक्के पेट्रोल ऐवजी 100 टक्के इथेनॉल टाकता येईल. यामुळे मी ऑटोमोबाईल कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्यासाठी आग्रह करतोय. पुण्यातील सर्व दुचाकी, रिक्षा इथेनॉलवर करा. इथेनॉल एक लिटर 62 रुपये तर पेट्रोल 120 रुपये आहे. पुण्यात हे सगळ्यात आधी सुरु करा. मी इथेनॉलचे पंप द्यायला सांगतो, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात वाहन क्षेत्रात मोठे बदल बघायला मिळतील.

आधी अण्णा हजारेंकडे 6 हजाराने कामाला, पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये, वाचा नेमकं काय केलं

तसेच टोयोटा, टाटा, महिंद्रा इत्यादी सगळेच ऑटोमोबाईल उत्पादक फ्लेक्स इंजिन आणणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच उसाचे दर कमी करणं अवघड आहे. कारण त्यात खूप राजकारण आहे. साखरेचे भाव कमी होतील पण उसाचे नाही, असंही गडकरी म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ते बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या;
शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटले, शेतकरी समाधानी, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
'मला साखरेतील काही कळत नाही, पण प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो'
Vidhan Parishad Election: भाजपचं ठरलं! विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील फिक्स? भाजपने आखली खास रणनीती

English Summary: Petrol diesel out, replaced green hydrogen - Nitin Gadkari's big statement
Published on: 04 June 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)