News

पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरनंतर मोदी सरकारने स्टील आणि सिमेंटचे दरही कमी केले आहेत. यामुळे ज्यांना घर बांधायचे आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कच्चा माल आणि लोखंड आणि स्टीलसाठी मध्यस्थ यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.

Updated on 06 June, 2022 5:48 PM IST

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारने अनेक गोष्टींचे दर कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फायदा होत आहे. असे असताना आता अजून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरनंतर मोदी सरकारने स्टील आणि सिमेंटचे दरही कमी केले आहेत. यामुळे ज्यांना घर बांधायचे आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कच्चा माल आणि लोखंड आणि स्टीलसाठी मध्यस्थ यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.

तसेच यामध्ये काही स्टील कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्यात येणार असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. काही स्टील उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारले जाईल. यासोबतच सरकारने प्लास्टिक उत्पादनांसाठी कच्चा माल आणि मध्यस्थ यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही म्हटले आहे. तसेच सिमेंटच्या किमती कमी करण्यासाठी लॉजिस्टिकचा अवलंब केला जात आहे.

यामुळे आता याचे भाव देखील खाली येण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या किंमती कमी होण्याची शक्यता असताना इमारत बांधकामातील सर्व वस्तू टाकल्या जातात. वाळू , गिट्टी, वीट इत्यादी सर्व गोष्टी सामान्य आहेत. बारची किंमत सातत्याने कमी होत आहे. मात्र, 60,000 रुपये प्रति टन हा आकडा परत आणण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे सिमेंट ट्रेड असोसिएशनचे राज्य अध्यक्ष श्यामूर्ती गुप्ता यांनी म्हटले आहे.

'पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ'

स्टीलच्या दरात देखील मोठी कपात करण्यात आल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे घराच्या किमती देखील भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे. हे दर असेच कमी होत गेले तर घराच्या किमती होणार आहेत, यामुळे घर बांधायचे आणि घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यामुळे याचा अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटले, शेतकरी समाधानी, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
Vidhan Parishad Election: भाजपचं ठरलं! विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील फिक्स? भाजपने आखली खास रणनीती
आधी अण्णा हजारेंकडे 6 हजाराने कामाला, पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये, वाचा नेमकं काय केलं

English Summary: petrol and diesel, steel cement prices come down, decision Modi government
Published on: 06 June 2022, 05:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)