सध्याच्या काळात पाहायला गेले तर शेतकऱ्यांची परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आहे त्यामुळे शेतकरी संकटात असलेले पाहायला भेटत आहेत.अगदी परिस्थिती ला सामोरे जात एका शेतकऱ्याने फेसबुक लाईट या सोशल मीडियाद्वारे सरळपणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत "खेत की बात" करत अगदी आदर व्यक्त करत त्यांनी आपले प्रश्न त्यांच्या पुढे व्यक्त केलेले आहेत. या शेतकऱ्याचे नाव भाऊसाहेब शेळके असून त्याने आपली फेसबुक द्वारे अनेक शेतकरी वर्गाच्या व्यथा मांडलेल्या आहेत.
भाऊसाहेब शेळके यांनी त्यांच्या शेतामध्ये प्रतिसंसद भरवून नरेंद्र मोदी यांच्याशी जो संवाद साधलेला आहे याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे जो की व्हिडिओ देशभरातील वेगवेगळया भागातील शेतकरी वर्गापर्यंत पोहचलेला आहे.लोकसभेमध्ये जसे खासदार आपल्या वेगवेगळ्या ज्या प्रकारे समस्या मांडत असतात त्याच प्रकारे भाऊसाहेब शेळके या शेतकऱ्याने सुद्धा फेसबुक लाईट या सोशल मीडिया माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधलेला आहे जे की शेतकऱ्याने त्यांना येणाऱ्या समस्या मांडलेल्या आहेत. भाऊसाहेब शेळके असे म्हणतात की मी जे मुद्धे मांडले आहेत ते मुद्धे लोक प्रतिनिधीनी संसदेत मांडले पाहिजे होते परंतु तसे होत नसल्यामुळे मी स्वतः इथे शेतामध्ये उभे राहून जे की भाऊसाहेब औतासमोर समोर उभा राहून आपली व्यथा मांडत आहेत.
भाऊसाहेब यांनी आपल्या शेतातच प्रति संसद भरवत जसे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये बोलतात त्याच प्रकारे त्यांनी लोकसभा अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शेतकरी वर्गाचे आपले प्रश्न मांडलेले आहेत. जवळ जवळ या २२ मिनिटे फेसबुक लाईव्ह संवाद दरम्यान यामध्ये त्यांनी इंधन दरवाढ, शेतमालाचा कमी भाव अशा प्रकारच्या समस्यांचे मुद्धे मांडलेले आहेत.भाऊसाहेब शेळके यांनी इंधनवाढ तसेच शेतमालाच्या भावाचे तर दर मांडलेच पण त्याच बरोबर त्यांनी कृषी कायदे रद्द करावे हा सुद्धा मुद्धा मांडलेला आहे. त्यांनी हे सुद्धा आपल्या मुद्या मध्ये मांडले आहे की प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकरी हिताचा राहिलेला नाही.सहकारी कारखाने बंद होऊन शेकऱ्यांच्या मालकीचे कारखाने विकले जात आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामीण भागामधील जे रस्ते आहेत ते रस्ते विकासाचे मुद्धे यासारखे प्रश्न सविस्तरपणे मांडलेले आहेत.
भाऊसाहेब शेळके यांचा लाईव्ह संवाद चा व्हिडिओ ग्रामीण भागातील लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतलेला आहे जे हा जो 22 मिनिटांचा जो उपक्रम झाला त्या उपक्रमाचे चांगलेच कौतुक केलेले आहे. भाऊसाहेब शेळके यांनी लाईव्ह द्वारे विचारले गेलेले प्रश्न तसेच अनेक मागण्या पाहत त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत आहे तसेच व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक्स तसेच कॉमेंट्स आणि शेअर सुद्धा केला जात आहे.
Published on: 30 July 2021, 08:52 IST