तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव गेल्या काही दिवसांपासून राज्यात दौरे करत असून अनेकांना पक्षात घेत आहेत. त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. यामुळे चर्चा सुरू झाली होती.
असे असताना पंकजा मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आता थेट राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. असे असले तरी पण बीआरसमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर राजू शेट्टी यांनी नारकाली आहे.
गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना यश मिळाले नाही. दरम्यान पंढरपूरमध्ये भागीरथ भालके यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
राजू शेट्टी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. यासोबतच आमच्या सोबत असणाऱ्या काहींना बीआरएस फोडत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो जमिनीची सुपीकता कशी वाढवावी?, जाणून घ्या...
के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. बीआरएसच्या विस्तारासाठी केसीआर यांनी महाराष्ट्राचा आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला होता.
ट्रॅक्टर अनुदानापासून शेतकरी वंचीत, अनुदान रखडल्याने शेतकरी अडचणीत...
काही दिवस टोमॅटो खाणं विसरा! आता टोमॅटो १२० रुपये किलोवर, पाऊस लांबल्याचा परिणाम..
भारतात एखादी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकते? कुटुंब मोठे असल्यास मर्यादा वाढते का? जाणून घ्या नियम
Published on: 28 June 2023, 10:41 IST