रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते परंतु हि उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते. अशा प्रचलित आधुनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आता मोठ्याप्रमाणावर जाणवू लागले आहेत.
जमिनीचा पोत बिघडतो, परिणामी जमिनीच्या उत्पादकता कमी होते.
रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे पिकांना पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते.
कीटकनाशकांच्या वापरामुळे अनिष्ट परिणाम होतात यात उपद्रव्यकारक कीटक मारतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीव जंतूही बळी पडतात.
रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे जमिनीच्या पोतावर होणार दुष्परिणाम टाळणे या खताचा पिकाच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे या उद्धेशातुन सेंद्रिय शेती ही संकल्पना पुढे आली.
जमिनीची सुपीकता शाश्वत ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांचा/पदार्थांचा वापर पिकांमध्ये व फळझाडांमध्ये करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जनावरांचे मलमूत्र, संजीवनी, हिरवळीचे खत, गांडूळ खत, इत्यादीचा वापर जरुरीचा ठरेल.
पुसा कृषी प्रदर्शनात धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण…
सेंद्रिय संजीवनी तयार करण्यासाठी जनावरांचे 200 किलो शेण त्यात 25 किलो सुपर फॉस्पेट टाकून लाकडी काटीच्या सहाय्याने ते चांगले एकजीव करून घ्यावे आणि हे तयार झालेले मिश्रण खताच्या रिकाम्या गोण्यात भरून त्यांची तोंडे बांधावीत व त्या गोण्या 30 दिवसापर्यंत सावलीत ठेवाव्यात. साधरणता 30 दिवसात सेंद्रिय खत तयार होते. ते खत चहा पावडर सारखे बनते यालाच सेंद्रिय संजीवनी म्हणतात.
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
जमिनीची पोत टिकवता येतो.
जमिनीतील सूक्ष्म जिवाणूच्या संख्येत वाढ होते.
जमिनीतील पाणी धारणा करण्याची क्षमता वाढवता येते.
पिक उत्पादन सुद्धा वाढवता येते.
अनुदानाने नव्हे, हमीभावाने सुटेल कांदादराची समस्या, मायबाप सरकार लक्ष द्या..
ई-मोजणी क्रांतिकारी, आहेत अनेक फायदे
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
Published on: 17 March 2023, 10:32 IST