ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे अनेकांचे ऊस शिल्लक राहिले, तर काही शेतकऱ्यांनी आपले ऊस पेटवून दिले. आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत. यामुळे ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
दरम्यान, शेतकर्यांना देय एफआरपीचा थकित आकडा 1 हजार 536 कोटी 19 लाख रुपये आहे. एकूण देय रकमेच्या हे प्रमाण 3.16 टक्क्यांइतके आहे. आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्यांना दिलेली आहे. मात्र हे कारखाने मोजकेच आहेत. तसेच राज्यातील 90 साखर कारखान्यांनी शेतकर्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर 80 ते 99 टक्के रक्कम देणारे 99 कारखाने आहेत.
तसेच पुढे 60 ते 79 टक्के रक्कम 7 कारखान्यांनी आणि शून्य ते 59 टक्के रक्कम 4 कारखान्यांनी दिलेली आहे. सध्याच्या साखर आयुक्तालयाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू होते.
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय..
उस एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्यांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी अजून 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देणे बाकी आहे. यामुळे एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने पाच कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत.
फक्त १८ दिवसात तयार होणारे हे खत शेतकऱ्यांना देत आहे नवसंजीवनी, घरीच करा तयार...
या कारखान्यांमध्ये सोलापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, ता. पंढरपूर. पुणे राजगड सहकारी, निगडे, ता. भोर. बीड अंबाजोगाई सहकारी, ता. अंबाजोगाई, बीड वैद्यनाथ सहकारी, ता. परळी. उस्मानाबाद जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी. या कारखान्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या;
बिग ब्रेकींग! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, भाजप आता राष्ट्रवादी फोडणार..
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, पदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाल्या द्रौपदी मुर्मू, जाणून घ्या..
राज्यात वाढणार नवीन सहकारी कारखाने? कारखान्यांना परवानगी देण्याची मागणी
Published on: 25 July 2022, 05:17 IST