कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (onion crop) यावर्षी बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कांदा उत्पादक शेतकरी, कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे हतबल झाले आहेत. गेल्या 5 महिन्यापासून कांदा दरात घसरण चालूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 हजार ते 2 हजार रुपये क्विटंल अशीच कांद्याची विक्री करावी लागत आहे.
बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढतील या हेतून रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक करण्यास सुरुवात केली. कांदा चाळीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली. मात्र केंद्र सरकारने बांग्लादेशातून (bangladesh) कांद्याची आयात सुरूच ठेवली आहे.
त्यामुळे स्थानिक कांद्याच्या भावात अधिक घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार कांदा आयात बंद करण्याची मागणी केली जात आहे. सध्या बाजारात कांद्याला बरीच मागणी आहे मात्र आयातही वाढल्याने कांद्याला हवा तसा भाव मिळत नाही. ही बाब आमदार छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.
'शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणे'
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी आता जर प्रत्येक खात्याला मंत्री असता तर शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारच्या लक्षात आल्या असत्या. पुढे ते असंही म्हणाले, की सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच कारभार चालवत आहेत. पण शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविल्यास कोणाला हरकत घेण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
Published on: 04 August 2022, 05:28 IST