News

गेल्या महिन्यांपासून कांद्याचे भाव खूप कमी झाले होते. गेल्या महिन्यात प्रति किलो ४ ते ७ रुपये किलो कांदा विकला जात होता. आता मात्र कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुपर एक नंबर कांदा २० ते २२ रुपये प्रति किलो दराने कांदा विकला गेला.

Updated on 16 June, 2022 4:29 PM IST

गेल्या महिन्यांपासून कांद्याचे भाव खूप कमी झाले होते. गेल्या महिन्यात प्रति किलो ४ ते ७ रुपये किलो कांदा विकला जात होता. आता मात्र कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुपर एक नंबर कांदा २० ते २२ रुपये प्रति किलो दराने कांदा विकला गेला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव सचिन बोराडे यांनी दिली.

कांद्याला येणार अच्छे दिन

मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. आता महिनाभरानंतर पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. कांदा पुन्हा एकदा 50 ते 60 रुपयांना मिळणार आहे. सध्या कांद्याचे भाव कमालीचे खाली आले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने हा प्रकार घडला आहे.

मात्र आता पुन्हा एकदा जुलैअखेरपर्यंत कांद्याची मागणी वाढल्याने भाव झपाट्याने वाढणार आहेत. महाराष्ट्रातील नाशिक येथील लासलगाव एपीएमसी मार्केटसह देशातील बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा वखारीत साठवून ठेवला आहे.

Rain Update: शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका; पहा मान्सून कुठे अडकलाय..!

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांद्याची आवक कमी झाली होती. केवळ पाच हजार पिशवी आवक झाली होती. मागील आठ ते दहा दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी कांद्याला १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेंतर्गत मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर...

रविवारी सुपर गोळा कांद्यास प्रती किलो १८ ते २१ रुपये असा भाव मिळाला आहे. मध्यम कांदा १५ ते १७ रुपये, गोल्टी कांदा ७.५ ते १० रुपये, तर बदला कांदा ५ ते ७ रुपये प्रतीकिलो या भावाने विकला गेला आहे. कांद्याच्या बाजारभावाने दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

खरीपातील चारा पिकाचे लागवड तंत्र

English Summary: Onions will once again fetch Rs 50 to Rs 60
Published on: 15 June 2022, 10:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)