कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असूनमहाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात लावला जातो.परंतु कांदा या पिकाचा विचार केला तर कायमच दराच्या बाबतीत अनिश्चितता असते.
कधी कधी कांदा शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा खूप जास्त काही देऊन जातो तर कधी कधी जे आहे ते सुद्धा हिरावूनयेतो अशी एकंदरीत कांद्याची परिस्थिती असते.महाराष्ट्र कांदा उत्पादनामध्ये प्रमुख राज्य आहे.जरा आता सध्या परिस्थिती चा कांद्याचा दराचा विचार केला तर अवघ्या सहा ते सात रुपये किलो या दराने कांदा विकला जातो आहे आणि कांद्याचा प्रति किलो उत्पादन खर्चाचा विचार केला तर तो 15 ते 20 रुपये किलो च्या दरम्यान आहे. यावरूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय असेल याची कल्पना येते. परंतु महाराष्ट्राच्या तुलनेने भारतातील इतर राज्यांचा विचार केला तर परिस्थिती नेमकी उलटी आहे. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बिहार मध्ये कांद्याचा दर हा चांगला आहे. याठिकाणी कांद्याचा कमीत कमी भाव 1000 ते जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये आहे. या तुलनेने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त भाव सुद्धा या पद्धतीचा नाही. बिहार प्रमाणेच उत्तर प्रदेश राज्यात देखील कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील एका बाजारात कांद्याचा भाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे.
नेमके असे होण्यामागील कारण काय असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर यामध्ये बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्यातील ठाकुरगंज बाजारपेठेचा विचार केला तर या ठिकाणी पंधरा मे या दिवशी कांद्याला कमीत कमी 1850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर जास्तीचा भाव दोन हजार शंभर रुपये मिळाला. या परिस्थिती विषयी बोलताना महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांची लॉबी मजबूत आहे. त्यामुळे ती स्वतःच्या अटीवर बाजार चालते व मोठ्या प्रमाणात नफा कमावते व त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही.
बिहार व केरळ राज्यातील कांद्याचे बाजार भाव
1- बिहार राज्यातील अररिया मध्ये कांद्याचा किमान भाव 1200 रुपये तर कमाल 1400 रुपये भाव होता.
2- केरळ मधील कोल्लममध्ये किमान भाव चार हजार 500 रुपये आणि सरासरी दर चार हजार 600 रुपये प्रतिक्विंटल होता.
तसेच केरळ राज्यातील कोट्टायम मध्ये कांद्याचा किमान दर 3500 तर कमाल दर चार हजार रुपये तर सरासरी दर 3800 रुपये प्रति क्विंटल होता.
महत्वाच्या बातम्या
Published on: 17 May 2022, 10:34 IST