पुण्यातील मंचर येथे आज कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर पुणे-नाशिक हायवे रोखून धरत आक्रमक रास्तारोको आंदोलन केले. सध्या कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून, यावर्षी कांदा उत्पादकांना प्रति एकर ७० हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. परंतु कांद्याला प्रति किलो केवळ १०-११ रुपये भाव मिळत आहे.
यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. अशा परिस्थितीत कांद्याला किमान २५ रुपये भाव मिळायला हवा. तरी राज्य सरकारने कांद्याला अनुदान द्यावे व केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.
या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मंचर पोलिसांनी रविकांत तुपेकर, प्रभाकर बांगर, काशिनाथ दौंडकर, आकाश दौंडकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना अटक करून पोलीस ठाण्यात आणले.
ब्रेकिंग! नितीन गडकरींची मोठी घोषणा, शहरातील टोल होणार रद्द, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
जर सरकारने मागण्यांची ८ दिवसात दखल घेतली नाही तर कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन उभे करेल, असा कडक इशारा यावेळी दिला. यामुळे आता येणाऱ्या काळात कांदा प्रश्न अजूनच तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना कृषी यंत्रांवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो आता शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार एक लाख रुपये, असा घ्या लाभ...
सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना संसद विशिष्टरत्न पुरस्कार प्रदान
Published on: 04 August 2022, 06:00 IST