आज दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये किंमत आता 60 रुपये किलोच्या पुढे गेली आहे.कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. दिल्ली, मुंबईसह देशभरातील बाजारात कांद्याचे दर सतत वाढत आहेत. अवकाळी पाऊस आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे कांद्याचे दर महिन्यात तीन पटींनी वाढले आहेत. वर्षाच्या सुरूवातीला हा कांदा 25-30 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता, आज ती दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 60 रुपये किलोच्या पुढे गेली आहे.
दिल्लीच्या गाझीपूर मंडीमध्ये कांदा साधारणत 30 ते 35 रुपये किलोला विकला जातो, यावेळी 40 ते 45 रुपये दराने विकले जात आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे येण्यास सुरवात होईल, त्यानंतर किंमती खाली येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मार्चनंतर कांद्याचे दर खाली येण्याची अपेक्षा आहे, जेव्हा बाजारात नवीन कांदा उत्पादन येईल. गेल्या 10 दिवसात कांद्याच्या घाऊक दरात 20% वाढ झाली आहे.
हेही वाचा:शेडनेटमधील रंगीत ढोबळी मिरचीमुळे वीस गुंठ्यात सात लाखांचे उत्पादन
कांदा किती महाग झाला आहे:
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार 11 जानेवारी 2021 रोजी हैदराबादमध्ये एक किलो कांद्याची किंमत 34 रुपये होती, जी आता 26 रुपयांनी वाढून 60 रुपयांवर आली आहे. 11 जानेवारीच्या तुलनेत दिल्लीत कांद्याचे दर 19 रुपयांनी, मेरठमध्ये 20 रुपये, मुंबईत 14 रुपये, 11 फेब्रुवारीला शिलॉंगमध्ये 10 रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर नाशिक, राजकोट, वारंगल, कोलकाता, नागपूर येथे कांदा 15 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
हेही वाचा:पणन टप्प्या टप्प्याने बंद करणार कापूस खरेदी
जाणून घ्या महागाईचे कारण काय?
पुरवठा कमी झाल्यामुळे कांद्याची किंमत वाढल्याचे आशियातील सर्वात मोठे फळ-भाजीपाला बाजार आझादपूर मंडी समितीचे अध्यक्ष आदिल अहमद खान यांनी सांगितले. तसेच यापूर्वी झालेल्या पावसाचा कांदा पिकावरही परिणाम झाला असून त्यामुळे आवक कमी झाली आहे. दुसरीकडे, कोरोना साथीच्या आणि नंतर शेतकरी चळवळीमुळे कांद्याचा पुरवठा ठराविक वेळी करता आला नाही.
Published on: 13 February 2021, 12:41 IST