सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. कांद्याच्या उत्पादनात देशाचा जगात दुसरा, तर देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. चालू वर्षी उत्पादन वाढल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर होत होऊन दर घसरले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्रालयाने बाजार हस्तक्षेप योजना लागू करावी, अशी शिफारस आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.
यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने डॉ. पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. या योजनेअंतर्गत किमान किमतीत समाविष्ट नसलेल्या बागायती आणि नाशीवंत शेतीमालाला संरक्षण दिले जाते. नाशीवंत मालाच्या किमती घसरतात, अशावेळी सरकारकडून ही योजना लागू केली जाते. याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो.
तसेच यामध्ये राज्य सरकारच्या विनंतीवरून संबंधित मालाचे झालेले नुकसान सामाईक केले जाते. केंद्र आणि राज्य यासाठी ५० : ५० टक्के आधार देतात. मात्र यात कांदा येत नाही. यात कांदा पिकाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली. यामुळे हा निर्णय होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अतिरिक्त उसाबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, पुण्यात साखर परिषदेचे आयोजन
राज्य सरकारला सूचना तसेच आवश्यक निर्देश करावेत, अशी मागणी डॉ. पवार केली आहे. राज्य सरकारने देखील योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ केंद्र शासनास सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे आता हा निर्णय झाल्यास पडलेल्या दराबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. याकडे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? सदाभाऊ खोत यांचा घणाघात
कोरोना वाढल्याने शाळा पुन्हा बंद? वर्षा गायकवाड यांचे मोठे वक्तव्य..
शेतकऱ्यांनो पिकलेल्या शेतमालावर विक्री आधीच घ्या कोट्यावधींचे कर्ज अन् शेतीमालही सुरक्षित
Published on: 06 June 2022, 02:55 IST