News

भारत हा एक प्राचीन तसेच संस्कृती ची जपवणूक केलेला देश आहे तसेच भारत हा कृषिप्रधान देश सुद्धा आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या ही शेती आणि पशुपालन व्यवसाय करत आहे. शिवाय शेती संलग्न व्यवसाय करून सुद्धा शेतकरी वर्ग उत्पन्नाचा स्रोत निर्माण करत आहेत.

Updated on 31 August, 2022 4:47 PM IST

गेल्या दोन दिवसांपासून बाजारांमध्ये गणेशोत्सवामुळे फळांची आणि फुलांची आवक आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणेशोत्सवामुळे बाजारात फुलांची आणि फळांची मागणी आणि आवक वाढल्यामुळे फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे यामुळं मात्र फुल उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.


पुण्यामध्ये गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर आणि उपनगरांमधील किरकोळ खरेदी दारांकडून फुलांना मोठी मागणी वाढली होती. गणपती च्या पूजेसाठी लागणाऱ्या झेंडू, शेवंती, ॲस्टर, कागडा इत्यादी फुलांना, तर शोभिवंत फुलांमध्ये गुलाब, कार्नेशन, ग्लॅडिओलससह या वेगवेगळ्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

हेही वाचा:'मातोश्री च्या दारात सुखशांती दाबून दे, हीच गणरायाकडे प्रार्थना'

प्रामुख्याने आपल्या भारत देशात वेगवेगळ्या पिकांची शेती केली जाते यामधे भाजीपाला, खरीप आणि नगदी पीक, रब्बी पिके, फुल शेती आणि फळ शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. देशामध्ये सणांच्या वेळी फूल आणि फळे यांना बाजारात प्रचंड मोठी मागणी असते.

हेही वाचा:Market News: नाफेडची खुल्या बाजारात हरभरा विक्रीची तयारी, हरभऱ्याचे दर घसरण्याची शक्यता?

पुणे कृषी बाजार समितीमध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यातून झेंडूच्या फुलांची मागणी वाढत आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढल्यामुळे फुलांच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. तसेच गणेशोत्सव असल्यामुळे फुले खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. 

फुलांची आवक आणि मागणी वाढल्यामुळे देशात मोठ्या प्रमानात फुलांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते किरकोळ बाजारात झेंडूच्या फुलांचा भाव हा 160 ते 180 रुपये किलो एवढं आहे शिवाय, शेवंती - 70-100, ॲस्टर 140-200, गुलछडी -200-300, डच गुलाब 20 नग -150-170, जरबेरा 40-60 रुपये एवढा आहे.

English Summary: On the occasion of Ganeshotsav, the flower market flourished, the price of flowers increased
Published on: 31 August 2022, 02:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)