दसऱ्याच्या सण आला की झेंडूच्या फुलांचे बाजारात दर हे नेहमीच्या वर्षीप्रमाणे कडाडले असतात. जे की यंदा स्थिर असलेले झेंडूच्या दरामध्ये दुपटीने वाढ झालेली असल्याचे बाजारामध्ये चित्र दिसत आहे. फक्त झेंडू ची नाही तर इतर जी फुले आहेत त्यांच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. जे की मागील महिन्यांपूर्वी पावसाने शेतीला झोडपून काढले जे की अनेक ठिकाणी नुकसान झेलावे लागले. सध्या बाजारात फुलांची उत्पादनापेक्षा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आंबेगाव, खेड, मंचर तसेच जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकरी जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत झेंडू,अस्टर, गुलछडी, जास्वंद, पांढरी शेवंती या सर्व फुलांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात.
मात्र यंदाच्या वर्षी पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फुलांची रोपे तसेच झाडे वाया गेली आहेत. जे की यंदा बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे मात्र पुरवठा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. असे तांबड मळा येथील फुलउत्पादक शेतकरी महादू तांबडे व बाजीराव तांबडे यांनी सांगितले. भोसरी, मंचर तसेच पुणे मधील फुले उत्पादक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन १०० रुपये किलो ने फुले विकत घेत आहेत. कलकत्ता या जातीची फुले ४ दिवस टिकतात यामुळे याना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
हेही वाचा:-पीकविमा कंपन्यांनी आदेश नाकारले असल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा कंपणीविरुद्ध आंदोलन जाहीर
आंबेगाव तालुक्यामध्ये तांबडमेळा असे एक गाव आहे जे की गाव फुलांचे गाव म्हणून ओळखले जाते. जे की या गावामधून रोज तीन टनपेक्षा जास्तच झेंडूची फुलांची खरेदी ही पुणे, मुंबई,मंचर, नारायणगाव, लोणावळा या भागातील व्यापारी करत असतात. मागील काही दिवसांपूर्वी जो पितृ पंधरवडा चालू होता त्यामध्ये झेंडूच्या फुलांचे भाव प्रतिकिलो बाजारामध्ये ३० ते ४० रुपये किलो होते तर ३ तारखेला म्हणजेच काल सोमवारी झेंडूच्या फुलांचे भाव प्रति किलो१५० रुपये झाले आहेत. सध्या दसरा सनामुळे सर्वच फुलांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे चित्र आपणास बाजारात पाहायला भेटत आहे.
हेही वाचा:-TVS ने केली नवीन क्लासिक स्कुटर लाँच, हे आहेत खास फीचर्स तर एवढी असेल किंमत
बाजारात फुलांचे भाव वाढले असल्याने नागरिक मोठ्या फुलांऐवजी लहान फुलांच्या हरला पसंद देत आहेत. जे की सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये फुलांचे भाव चढ राहतील असे मंचर येथील फुलउत्पादक व्यापारी रतण निघोट यांनी सांगितले आहे. सध्या बाजारातही झेंडूच्या फुलाचा दर म्हणले तर १४० रुपये किलो आहे तसेच पांढरी शेवंती या फुलाचा प्रतिकिलो दर हा २०० ते २२५ रुपये किलो आहे. किलो. गुलछडी / रजनीगंधा या फुलाचा बाजारात प्रतिकिलो दर हा ३०० रुपये आहे तर एक गुलाब २० रुपये व रुपये अस्टर २०० रुपये शेकडा ने चालू आहे.
Published on: 04 October 2022, 02:47 IST