गेल्या 8 महिन्यांपासून कांद्याचे दर (Onion rates) स्थिर होते. आता सणासुदीच्या काळात कांदा उसळी घेतली आहे. मागील आठवड्यापर्यंत 7 ते 10 रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता थेट 15 ते 25 रुपये किलोदरम्यान गेले आहेत. काही ठिकाणी कांदा 30 रुपयांहूनही जास्त किमतीला विकला जात आहे.
या कारणामुळे बाजारात होणार मोठी वाढ
परतीच्या पावसाने लांबवलेला मुक्काम, परिणामी संकटात सापडलेली नवीन लागवड, त्यामुळे कांद्याच्या दरात तेजी येण्यास सुरुवात झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. येत्या काळात हे दर असेच वाढत राहणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवत असल्याने दिवाळीत कांदा रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा: लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कोणाला किती मदत? जाणून घ्या!
पावसानेही मुक्काम लांबवला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीला पाणी लागले आणि त्यामुळे कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. हा भिजत चाललेला कांदा जास्त वेळ साठवून ठेवता येणार नसल्याने शेतकऱ्यांना हा कांदा बाजारात पाठवावा लागणार आहे. दुसरीकडे आता लावलेली कांद्याची नवीन रोपेही पावसाच्या पाण्यात सापडली आहेत.
अनेक ठिकाणी शेतीच्या शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पुढील हंगामात कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कांदा कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आत्ताच कांद्याची खरेदी वाढविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, अचानक बाजारात कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरही वाढू लागले आहेत.
हेही वाचा: कीटकनाशकांच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी ड्रोन फवारणी SOP तंत्रज्ञान
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असणाऱ्या लालसगावमध्येही कांद्याच्या दरांचा (Onion rates) आलेख वाढत असल्यामुळं आता तुमच्या घरानजीक असणाऱ्या बाजारपेठांमध्येही कांदा रडवणार अशीच चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा: इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच; शेतकऱ्याचे नशीब चमकणार
Published on: 13 October 2022, 10:33 IST