राज्य सरकारने लाखो विठूभक्तांना मोठा दिलासा दिला आहे. आता पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.
वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल. वारी दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आली तर एक लाख रुपये देण्यात येतील.
अंशत:अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार असल्याचे राज्यसरकारकडून सांगण्यात आले आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
दूध दर आंदोलन पेटले! सांगोल्यात रास्ता रोको, शेतकरी अडचणीत..
त्यात अनेक वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. याचा वारकऱ्यांना फायदा होणार आहे.
दुग्धव्यवसायाला मिळते गती, हे यंत्र अनेकांची कामे मिनिटांत करते, जाणून घ्या...
कारखानदारांनो एफआरपी कधी देणार? पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १८९ कोटींची एफआरपी थकित
1 जुलैपासून शेतकरी जनजागृती अभियान, राजू शेट्टी करणार रायगडावर मोठी घोषणा
Published on: 22 June 2023, 01:41 IST