राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संदर्भात आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान बद्दलण्याची शक्ती आहे.
त्यासाठी ती जास्त प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे. माती परिक्षणाची कामे कृषी विद्यापीठांकडून वेळोवेळी करून त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येईल.
बदलत्या वातावरणानुसार अधिक प्रभावी व उत्पन्नवर्धक ठरतील. अशी बियाणे निर्मिती करण्यासाठी बियाणे संशोधनाची प्रक्रिया गतिमान करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी केल्या.
तसेच राज्यातील कृषी सेवकांच्या मानधन वाढीची 2019 पासून प्रलंबित असलेली मागणी मान्य करून हे मानधन 6 हजार वरून वाढवून 16 हजार रुपये केल्याबद्दल आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषी अधिकारी उपस्थित होते.
पुणे बाजार समितीला आली जाग, ९३ अडत्यांवर कारवाई, लाखांचा दंड वसूल...
कृषी सेवकांच्या अन्य अडचणी सोडवण्यासंदर्भात देखील शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान, यामुळे अडचणीत सोडवण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
मोठी बातमी! शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील बीआरएसच्या पक्षात दाखल...
पीक विमा भरण्यासाठी महाराष्ट्राला केवळ 3 दिवसांची मुदतवाढ, इतर राज्यात 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
शेतकऱ्यांनो पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी..
Published on: 03 August 2023, 02:15 IST