सध्या साखर कारखानादारी अडचणींचा सामना करत आहे. अनेक कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकले नाहीत, तर काही कारखाने बंदच पडले आहेत. यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावर अनेकदा भाष्य करतात, आता देखील त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आधी राज्यात कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होते, आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील असे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले, देशात साखर गरजेपेक्षा जास्त आहे. ब्राझिलमध्ये दुष्काळ पडला म्हणून आपल्याकडील साखर कारखानदार आनंदी झाले. पंतप्रधान मोदींसमोर मी प्रस्ताव मांडला की गरिबांना आपण साखर स्वस्त देऊ. मग साखरेची किंमत 32 रुपये केली. मात्र तरीही पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी नाईलाजास्तव कमी दरात साखर विकली.
तसेच ते म्हणाले, राज्यात भाजपचं काम करत असताना या साखर कारखान्याची माहिती मिळाली. त्यावेळी लायसन्स राज होतं. विरोधकांना लायसन्स मिळेल अशी शक्यता नव्हती. आमच्या सत्तेच्या काळात या कारखान्याला परवानगी मिळाली. विदर्भात मी तीन कारखाने चालवतो ते आता फायद्यात आहे. हे मात्र क्षणिक आहे. ज्यांना सहकारी साखर काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो, असेही ते म्हणाले.
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध
साखर कारखाने काढणं अवघड होतं. संघाच्या माणसाने कारखाना काढला आणि चालवला याचा जास्त आनंद आहे. साखरचे उत्पादन कमी करा आणि ईथेनॉल वाढवा. त्याशिवाय कारखाने वाचणार नाहीत. येणाऱ्या काळात जलव्यवस्थापनाला महत्व आहे. आगामी काळात ग्रीन हायड्रोजनला महत्त्व येणार आहेत. आता आपण ऊर्जेला आयात करणारा नाहीतर निर्यात करणारा देश झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो हा चारा ठरतोय फायदेशीर, गाईच्या दुधात होईल दुप्पट वाढ
कार-बाईक चालवणाऱ्यांची होणार दिवाळी! नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...
Published on: 19 June 2022, 09:45 IST